Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjali Damania : अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया अनेक दिवसांपासून आक्रमकरित्या आरोप करत आहेत. वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात त्यांनी काही पुरावे समोर आणले होते.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 22, 2025 | 09:17 PM
अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?

अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
Close
Follow Us:

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया अनेक दिवसांपासून आक्रमकरित्या आरोप करत आहेत. वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात त्यांनी काही पुरावे समोर आणले होते. या हत्याप्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला बीड ऐवजी लातूर कारागृहात हलिवण्याच्या निर्णयावरही त्यांनी काल टीका केली होती. दरम्यान अंजली दमानिया यांनी आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना बीडमधील परिस्थितीची माहिती दिली. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

अंजली दमानिया म्हणाल्या, रश्मी शुक्ला यांना बीडमधील दहशतीची माहिती दिली. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची माहिती दिली. “व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड या दोन कंपन्यामध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे आहेत. यात वाल्मिक कराडही भागीदार आहे. या दोन कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट कसे मिळाले? ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाप्रमाणे मंत्री किंवा आमदार जर लाभ मिळवत असतील तर ते चुकीचे आहे. लोकप्रतिनिधीला नियमाप्रमाणे लाभाचे पद घेता येत नाही. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

संतोष देशमुख प्रकरणात आरोपी आणि पोलिसांचे संबंध आहेत. ते मोडून काढायचे असतील तर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात टाकले जावे, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी दिली. हे केल्याशिवाय या प्रकरणाची नीट चौकशी होणार नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. जगमित्र शुगर मिल्स कंपनीसाठी ६२ कोटींचे कर्ज यांना कोणत्या निकषावर देण्यात आले? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. ईडी आणि सीआयडींनी त्यांच्या कंपन्यांची चौकशी केली पाहीजे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले असून त्यावर उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे कळले. खरेतर त्याची पोलीस कोठडी इतक्या लवकर संपली कशी? असा प्रश्न निर्माण होतो. कारण कालच काही व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर याची सखोल चौकशी करण्याची गरज होती. पण तरीही त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तसेच विष्णू चाटे या आरोपीलाही त्याच्या मागणीनंतर लातूर कारागृहात ठेवण्याचा पर्याय दिला गेला. हे चुकीचे आहे.”

संतोष देशमुख प्रकरणात आरोपी आणि पोलिसांचे संबंध आहेत. ते मोडून काढायचे असतील तर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात टाकले जावे, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी दिली. हे केल्याशिवाय या प्रकरणाची नीट चौकशी होणार नाही.

Web Title: Anjali damania serious allegations on dhananjay munde santosh deshmukh case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • Walmik Karad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.