Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Ward Formation: मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभाग रचनेस मंजुरी: दिवाळीनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता

मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 06, 2025 | 09:13 AM
Mumbai Municipal Corporation Ward Structure

Mumbai Municipal Corporation Ward Structure

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागरचनेला मंजूरी
  • महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर हालचालींना गती मिळाली आहे.

Share Market Today: बाजारात मंदीची चाहूल! गिफ्ट निफ्टीने दिले नकारात्मक संकेत, गुंतवणूकदार चिंतेत

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार असून, सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.

मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली.

महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण ४९४ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींचा सविस्तर विचार करून नगरविकास विभागाने सुधारित आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर आयोगाने अंतिम मंजुरी देत संपूर्ण प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला आहे. या अंतिम आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या १ कोटी २४ लाख ३३७ असून, ती २२७ प्रभागांमध्ये विभागण्यात आली आहे. या प्रभाग रचनेनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

IND W vs PAK W : पाकला आणखी एकदा भारतीय संघाने चारली धूळ! टीम इंडियाने विश्वचषकाचा दुसरा विजय नोंदवला

दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

राज्यातील महानगरपालिका निवडणुका कधी होणार, याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. “आता कुणीतरी म्हणतील की, निवडणूक आयोगाशी माझी चर्चा झाली का? पण मी ४० वर्षे या क्षेत्रात घालवली आहेत. त्या अनुभवावरून सांगतो, दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया,” असे पाटील म्हणाले. निवडणुकीची तुलना करत त्यांनी म्हटले, “निवडणूक ही फास्ट ट्रेनप्रमाणे आहे; प्लॅटफॉर्मवर जो राहील तोच राहील.” तसेच, कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी सल्ला दिला की, “नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशिबाचंही योगदान महत्त्वाचं असतं.”

पुणे महापालिकेची प्रभागरचना जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली असून त्यासाठी प्रक्रिया राबवण्यासही सुरुवात केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तर त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे.

 

Web Title: Approval for the formation of 227 wards for the mumbai municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 09:13 AM

Topics:  

संबंधित बातम्या

BMC Election 2025 : नवी मुंबई- ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटणार? शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष
1

BMC Election 2025 : नवी मुंबई- ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटणार? शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.