फोटो सौजन्य - बीसीसीआय वूमन
महिला एकदिवसीय विश्वचषकाचा सहावा सामना काल पार पडला हा सामना कोलंबो येथील प्रेमादासा स्टेडियम वर खेळवण्यात आला. भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामना भारताच्या संघाने 88 धावांनी विजय मिळवला. यामध्ये दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांची कौतुकास्पद कामगिरी राहिली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या संघावर दबदबा निर्माण केला होता. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
सामनाबद्दल सांगायचे झाले तर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या सलामी वीर फलंदाज प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. प्रथम फलंदाजी करताना भारत २४७ धावांवर ऑल आऊट झाला. संघाकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात पाकिस्तान १५९ धावांवर ऑल आऊट झाला. गोलंदाजीत दीप्ती शर्माने तीन विकेट्स घेतल्या, तर क्रांती गौरनेही फक्त २० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. हा भारतीय संघाचा विश्वचषकातील सलग दुसरा विजय आहे.
२४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. मुनीबा अली फक्त दोन धावांवर बाद झाली. त्यानंतर सदाफ शमास सहा धावांवर बाद झाली. आलिया रियाझही फलंदाजीत लक्षणीय कामगिरी करू शकली नाही आणि दोन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. सिद्रा अमीन आणि नतालिया परवेझ यांनी पाकिस्तानचा डाव सावरला आणि २६ धावांत तीन विकेट गमावल्यानंतर चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
क्रांतीने नतालियाला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर संघाचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धावले आणि संपूर्ण संघ १५९ धावांवर बाद झाला. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्माने तीन बळी घेतले, तर क्रांतीने फक्त २० धावांत तीन बळी घेतले. स्नेह राणानेही दोन बळी घेतले.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. स्मृती मानधनाने फलंदाजीत चांगली कामगिरी केली नाही, तिने ३२ चेंडूत २३ धावा केल्या. प्रतिका रावललाही चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही, ती ३७ चेंडूत ३१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही तिच्या फलंदाजीने चाहत्यांना निराश केले.
India lead the #CWC25 points table following a comprehensive win against Pakistan 👌#INDvPAK 📝: https://t.co/StZL05DcR0 pic.twitter.com/igfG79ZDz8 — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2025
३४ चेंडूंचा सामना केल्यानंतर हरमन १९ धावांवर बाद झाला, त्याने खूपच खराब शॉट खेळला. दरम्यान, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ४६ धावा करून हरलीन देओलने आपली विकेट गमावली. जेमिमा रॉड्रिग्जनेही चांगली सुरुवात केली आणि नंतर ती ३२ धावांवर बाद झाली. दीप्ती शर्माने ३३ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये रिचा घोषने फक्त २० चेंडूत ३५ धावांची जलद खेळी करत संघाला २४७ धावांपर्यंत पोहोचवले.