Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला परिमंडळातील 2 लाख ग्राहकांची थकबाकी माफ; व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ

बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३६६ ग्राहकांकडे १०७ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी असून, १९ कोटी ९५ लाख रुपये व्याज आणि १ कोटी २८ लाख रुपये विलंब आकार माफ होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 15, 2026 | 12:42 PM
अकोला परिमंडळातील 2 लाख ग्राहकांची थकबाकी माफ; व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ

अकोला परिमंडळातील 2 लाख ग्राहकांची थकबाकी माफ; व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ

Follow Us
Follow Us:
  • अकोला परिमंडळातील २ लाख ४१ हजार ९२ ग्राहकांना ‘अभय योजना २०२६-२७’चा लाभ घेता येणार.
  • कायमस्वरूपी आणि तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी योजना लागू.
  • १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केला जाणार.
अकोला : महावितरणतर्फे कायमस्वरूपी तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाब व लघुदाब ग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अकोला परिमंडळातील २ लाख ४१ हजार ९२ थकबाकीदार ग्राहकांना घेता येणार आहे. थकबाकीमुक्त होण्याची ही संधी असून, पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी केले.

योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व अन्य बिगरशेती ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक यासाठी पात्र आहेत. मात्र, कृषिपंप ग्राहक आणि सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना यातून वगळण्यात आले आहे. योजनेंतर्गत थकबाकीवरील १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केला जाणार आहे. उर्वरित मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे.

दरम्यान, लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम आगाऊ भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येईल. उच्चदाब ग्राहकांसाठी ३ ते ६ हप्त्यांचा पर्याय उपलब्ध आहे. २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजजोडणी पुन्हा सुरू करताना प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळेल.

अकोला परिमंडळात २४१ कोटींची मूळ थकबाकी

अकोला परिमंडळातील पात्र ग्राहकांकडे २४१ कोटी ७ लाख रुपयांची मूळ थकबाकी असून, त्यावर ४० कोटी ५५ लाख रुपये व्याज आणि २ कोटी ९५ लाख रुपये विलंब आकार आहे. अकोला जिल्ह्यातील ६९ हजार ४१९ ग्राहकांकडे ७५ कोटी ४० लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. त्यांचे १२ कोटी २९ लाख रुपये व्याज आणि ९३ लाख रुपये विलंब आकार माफ होणार आहे.

विलंब आकार माफ करण्यात येणार

बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३६६ ग्राहकांकडे १०७ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी असून, १९ कोटी ९५ लाख रुपये व्याज आणि १ कोटी २८ लाख रुपये विलंब आकार माफ होईल. वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार ३०७ ग्राहकांकडे ५८ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी असून, ८ कोटी २९ लाख रुपये व्याज आणि ७२ लाख ५२ हजार रुपये विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा

योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाइल अॅपद्वारे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पात्र थकबाकीदार ग्राहकांनी मुदतीत अर्ज करून व्याज व विलंब आकाराच्या सवलतीचा लाभ घ्यावा आणि थकबाकीचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

FAQ

1. ‘अभय योजना २०२६-२७’ कोणासाठी आहे?
कायमस्वरूपी किंवा तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या पात्र उच्चदाब व लघुदाब ग्राहकांसाठी ही योजना आहे.

2. अकोला परिमंडळातील किती ग्राहकांना लाभ मिळणार आहे?
एकूण २ लाख ४१ हजार ९२ थकबाकीदार ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

3. योजनेत कोणती सवलत मिळणार आहे?
थकबाकीवरील १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केला जाणार आहे.

Web Title: Arrears of 2 lakh consumers in the akola circle waived off nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • akola news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.