संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये कधी चोरी करणे तर कधी तर कधी स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर ट्रू कॉलरला (Truecaller) पीएसआय शिंदे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे असे नाव सेट करून पीएसआय (Fake PSI) असल्याचे भासवत दुकानदाराकडून हजाराचे साहित्य लाटणाऱ्याचा अखेर घडा भरला आहे. याच तोतया पोलीस उपनिरीक्षकाला आरोपी पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे.
ज्ञानेश्वर नारायण देशमुख (पुंडलिक नगर) असे याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याने पीएसआय असल्याचे सांगत अनेक जणांना फसवल्याचे समोर आले आहे. तर त्याच्याकडून दोन लाख 4 हजार 72 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे पोलीस उपनिरीक्षक मेघा माळी यांनी सांगितले.