
मुंबई : वाघ, किंवा बिबट्या म्हटलं की आपली एका क्षणासाठी का असेना, भंबेरी उडते. मात्र प्रत्यक्षात जर बिबट्या समोर आला तर आपली काय अवस्था होईल. मात्र प्रत्यक्षात समोर बिबट्या अवतारल्याचं चित्र मुंबईत घडलं आहे. मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटी ही देशात प्रसिद्ध आहे. दरम्यान, याच गोरेगाव येथील फिल्म सिटीत मराठी मालिकेचे शूटिंग सुरु असताना, अचानक ह्या सेटवर बिबट्या शिरल्यामुळं सगळ्याचीच घाबरघुंडी उडाली आहे. त्यामुळं तिथे भीतीचे वातावरण आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Leopard enter on sets of Marathi serial in Goregaon Film City Mumbai)
सेटवर 200 हून अधिक लोकं
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरश श्यामलाल गुप्ता यांनी सांगितले की, जेव्हा बिबट्या सेटवर शिरला त्यावेळी सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते. मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये अनेक मालिका आणि सिनेमांचे शूटिंग सुरू असते. या परिसराच्या जवळ आरे जंगल आणि नॅशनल पार्क असल्याने तेथे जंगली प्राण्यांचा अधिवास असल्याचं पहायला मिळतं. मात्र, आता थेट बिबट्याच मालिकेच्या सेटवर शिरला. त्यामुळं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गोरेगावच्या बाजूल आरे जंगल आणि नॅशनल पार्क असल्याने येथे जंगली प्राणी तसेच बिबट्या, वाघ यांचा वावर असतोय याआधी देखील अश्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, 17 जुलै रोजी सुद्धा फिल्म सिटीत बिबट्या शिरल्याची बातमी समोर आली होती. इतकेच नाही तर या बिबट्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. एका हिंदी मालिकेच्या शूटिंग दरम्यान ही घटना घडली होती. यामुलं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.