
Atal Bihari Vajpayee Nanded Visit 1982, History of BJP Maharashtra,
BJP History: ‘अंधकार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल’ अशी भविष्यवाणी करणारे भाजपाचे पहिले अध्यक्ष अटलिबहारी वाजपेयी यांचे शब्द आज वास्तवात उतरल्याची भावना नांदेड जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकत्यांमध्ये प्रकर्षांने व्यक्त होत आहे. साडेचार दशकांच्या प्रदीर्घ आणि संघर्षमय प्रवासानंतर भारतीय जनता पक्षाने स्थानिक ते केंद्र पातळीपर्यंत सत्ता प्रस्थापित करत ‘ यत्र तत्र सर्वत्र आपली छाप निर्माण केली आहे.
‘अंधकार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल,’ अशी घोषणा ४५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेवेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. साडे चार दशकांच्या भाजपाच्या राजकीय प्रवासाचे अनेक साक्षीदार नांदेड शहरासह जिल्ह्यात आहेत. ज्येष्ठ नेते स्व. प्रमोदजी महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे नांदेडशी जिव्हाळ्याचे नाते होते, पक्षविस्ताराच्या निमित्ताने या नेत्यांचा परिसस्पर्श नांदेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना झाला, स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी नांदेडमध्ये अनेकदा सभा घेत नांदेडमधील भाजपाईंचे मनोधैर्य वाढविले.
जिल्ह्यात माजी आ.स्व. अॅड. चंद्रकांत मस्की, स्व. भोजालाल गवळी, स्व. अरविंदराव एकताटे, प्रा. कालिंदीताई फाटक, पं लक्ष्मीनारायणजी जोशी, गंगाधरजी तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष बालासाहेब पांडे, प्रा. गणपत राऊत, केरबा सावकार बिडवई, मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी, स्व. मदनमामा देशपांडे, प्रा. नंदू कुलकर्णी, एल.के. कुलकर्णी, जनार्दन ठाकूर, बालाजीराव देशपांडे, स्व. ईश्वर भैय्या यादव, आदींसह अनेक निष्ठावंत ‘भाजपाई’ नी काँग्रेससह इतर पक्षांच्या विरोधात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेत विचारांची मशाल पेटवून ठेवली.
दुसऱ्या फळीतील प्रविण साले, चैतन्यबापू देशमुख, अरूवती पुरंदरे, मंजिरी पुरंदरे, धनश्री देव, मोहनरिह तौर, प्रभाकर पेटकर, भरत यादव, बागड्या यादव, मुरलीधर गजभारे, व्यंकटेश साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपाच्या विचारांचा जागर करण्यात आग्रणी राहिले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रदेश केला, त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णतः बदलले, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले शेकडो चव्हाण समर्थक आता ‘भाजपाई’ म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपा असे चित्र आगामी काळात निर्माण करण्याचा संकल्प खा. अशोकराव चव्हाण यांनी केला आहे.
Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू
भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाल्यानंतर पक्षवाढीसाठी अध्यक्ष या नात्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी देशभर दौरे काढले होते. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून ते १९८२ मध्ये प्रथमच नांदेड येथे आले. चिखलवाडी येथील उदासी मठ मैदानावर त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत तत्कालीन भाजपा पदाधिका-यांनी पक्ष कार्यासाठी त्यांना तीन लाख रुपयांची शैली भेट दिली होती. यामध्ये आ. चंद्रकांत मस्की, गणपतराव राऊत आदीचा समावेश होता, पक्षवाढीसाठी कार्यकत्यांनी एकत्र येऊन निष्ठेने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. सभेनंतर त्यांनी डॉ. प्रभाकर पुरंदरे यांच्या निवासस्थानी भोजन घेतले होते.