Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेकअप आर्टिस्ट बनण्याचं तिचं स्वप्न भंगलं, अवंतीचा समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू

अवंती पोहणीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठी ती शुक्रवारी सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्सने निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला.

  • By साधना
Updated On: Jul 01, 2023 | 06:53 PM
avanti pohankar

avanti pohankar

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) मध्यरात्री बुलढाण्याजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सचा (Vidarbha Travels) भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटली आणि डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली. या बसमध्ये झोपेतच 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच एक होती 25 वर्षीय युवती अवंती पोहणीकर.(Avanti Pohanikar) अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

अवंती पोहणीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठी ती शुक्रवारी सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्सने निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईला धक्का बसला.

अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, तिला काही झालं तर नसेल या भीतीने आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मला अवंतीजवळ घेऊन चला, असं म्हणत तिच्या आईने टाहो फोडला. त्यावेळी तिला अवंती अपघातात वारली की जिवंत आहे हे माहिती नव्हतं.

अवंतीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर तिच्या वडिलांचं ती लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर तिची आई प्रणिता यांनीच अवंती आणि तिची बहीण मोनू यांचा सांभाळ केला. प्रणिता या मेघे विद्यापिठात कार्यरत आहेत. आईची प्रकृती बरी नसते म्हणून अवंती परदेशी गेली नाही. पण तिने एक मॉडेल म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली. अवंतीला मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं होतं. मात्र तिनं आणि तिच्या आईने पाहिलेलं स्वप्न अपूर्णच राहिलं. ती नोकरीच्या निमित्तानेच पुण्याला जात होती. पण वाटेत काळाने तिच्यावर घाला घातला.

बसचालकावर गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चालकाला अटक देखील करण्यात आली आहे. शेख दानीश शेख इसराईल हा विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक होता. त्याच्यावर 279, 304, 337 व 427 आयपीसीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Avanti pohanikar passed away in samruddhi highway accident nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2023 | 06:49 PM

Topics:  

  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश
1

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध
2

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

समृद्धी महामार्गावरच केला गेला ‘मॉक ड्रिल’; 85 अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही सहभागी
3

समृद्धी महामार्गावरच केला गेला ‘मॉक ड्रिल’; 85 अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही सहभागी

मोठी बातमी! महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
4

मोठी बातमी! महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.