Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: उज्ज्वला योजनेचा बोजवारा! गृहिणींवर पुन्हा चुलीवर स्वयंपाकाची वेळ

एलपीजीची कसलीही टंचाई नाही. मंत्रालयाने जारी केलेल्या 'एलपीजी नियंत्रण आदेशा'चे अनुसरण करत देशांतर्गत रिफायनरी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 27, 2026 | 02:32 PM
Ahilyanagar News, LPG Cylinder Delay, Chhagan Bhujbal, Global War Impact on Fuel,

Ahilyanagar News, LPG Cylinder Delay, Chhagan Bhujbal, Global War Impact on Fuel,

Follow Us
Close
Follow Us:
  • देशात इंधन टंचाई नसल्याचा सरकारचा दावा
  • उज्ज्वला योजनेचा पुरता बोजवारा
  • गृहिणींवर रॉकेलवर स्वयंपाक करण्याची वेळ
Ahilyanagar News: देशात इंधन टंचाई नसल्याचा सरकार कितीही दावा करत असले तरी राज्याच्या विविध भागात स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) साठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उज्ज्वला योजनेचा पुरता बोजवारा उडला असून गृहिणींवर रॉकेलवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठीही पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाहनचालकांना मर्यादित स्वरूपात पेट्रोल आणि डिझेल देण्यात येत आहे. काही पंपावर तर इंधन संपल्याचे बोर्ड झळकल्याचे दिसत आहेत.

पश्चिम आशियातील युद्धामुळे देशातील गॅस आणि पेट्रोलचे संकट सातत्याने अधिकच गडद होत आहे. केंद्र सरकारचा दावा आहे की, देशात पेट्रोल आणि गॅसचा पुरेसा साठा आहे. इंधन घेऊन जहाजे सातत्याने येत आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही. संकटासारखी परिस्थिती ही केवळ एक अफवा आहे. दुसरीकडे मात्र इंधन संकटावर मात करण्यासाठी सरकारने सर्व राज्यांना अतिरिक्त ४८,००० किलो लिटर रॉकेलचे वाटप केले आहे.

Pune Water Supply: पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील

महाराष्ट्राला अंदाजे ३७,४४,००० लिटर रॉकेल मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक – शिधापत्रिका धारकाला ३ लिटर रॉकेल देण्याची व्यवस्था केली आहे. अन्न – व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, शिधावाटप दुकानांव्यतिरिक्त पेट्रोल पंपांमार्फतही रकिलचे वितरण केले जाईल. या सर्व दाव्यांनंतर आणि व्यवस्थेनंतरही आणि पुरेसा साठा असूनही गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा का कायम आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.

गॅससाठी लांबच लांब रांगा, चुलीवर स्वयंपाक

देशभरातील सर्व राज्यांमध्ये गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नाही. २५ दिवस बुकिंग करूनही लोकांना अद्याप सिलिंडर मिळत नाहीत. डिलिव्हरी ओटीपी संदेश घेऊन लोकांना एजन्सींवर लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत, गॅस संपल्यावर लोक चुलीवर स्वयंपाक करत आहेत. या संकटाचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसत आहे. अनेक शहरांमध्ये सामुदायिक स्वयंपाकघरे उभारण्यात आली असून, अनेक कुटुंबे एकत्र चुलींवर स्वयंपाक करत आहेत.

एलपीजी उत्पादन वाढले, आयातीची गरज घटली

एलपीजीची कसलीही टंचाई नाही. मंत्रालयाने जारी केलेल्या ‘एलपीजी नियंत्रण आदेशा’चे अनुसरण करत देशांतर्गत रिफायनरी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. यामुळे एलपीजीचे दैनंदिन उत्पादन ५० टीएमटी पर्यंत वाढले आहे, जे आपल्या एकूण गरजेच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे; प्रत्यक्षात आपली एकूण दैनंदिन गरज साधारणपणे ८० टीएमटी इतकी आहे. परिणामी, एलपीजी आयातीची निव्वळ दैनंदिन गरज केवळ ३० टीएमटी पर्यंत कमी झाली आहे.

राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार

 

८०० टीएमटी एलपीजी बाहेरून येणार

देशांतर्गत उत्पादनाव्यतिरिक्त ८०० टीएमटी इतक्या एलपीजीचा कामों पुरवठा परदेशातून येणे निश्चित झाले असून तो सध्या अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतून भारताच्या दिशेने येत आहे. हा पुरवठा भारतातील २२ एलपीजी आयात केंद्रांवर उतरवला जाईल, ही संख्या २०१४ मध्ये अस्तित्वात असलेल्या ११ केंद्रांच्या तुलनेत दुप्पट आहे. तेल कंपन्या दररोज ५० लाखांपेक्षा जास्त एलपीजी सिलिंडर्सचा यशस्वी पुरवठा करत आहेत. ग्राहकांनी घाबरून केलेल्या अतिरिक्त बुकिंग केल्याने सिलिंडर्सची मागणी ८९ लाखांपर्यंत वाढली होती, मात्र आता ती पुन्हा ५० लाखांच्या पातळीवर आली आहे.

 

 

 

Web Title: Back to chulhas lpg shortage forces homemakers to use kerosene amid global conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.