Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहीहंडी प्रकरण – अविनाश जाधव आणि अभिजीत पानसेला अटकपूर्व जामीन मंजूर

दहीहंडी प्रकरणामध्ये मनसेने पदाधिकारी अविनाश जाधव (Avinash Jadhav) आणि अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटकपूर्व जामीन (Bail To Avinash Jadhav And Abhijeet Panse) मंजूर करण्यात आला आहे.

  • By साधना
Updated On: Jul 05, 2022 | 05:39 PM
दहीहंडी प्रकरण – अविनाश जाधव आणि अभिजीत पानसेला अटकपूर्व जामीन मंजूर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दहीहंडी (Dahihandi Case) उभारताना घालून देण्यात आलेल्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेले मनसेने पदाधिकारी अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)  अटकपूर्व जामीन (Bail To Avinash Jadhav And Abhijeet Panse) मंजूर करण्यात आला आहे. अटक झाल्यास २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश दिले.

गोपाळकाला उत्सव साजरा करताना जागोजागी उभारण्यात येणाऱ्या दहीहंड्या फोडण्यासाठी उंच मानवी मनोरे उभे राहतात. त्यात अनेक गोविंदा जखमी होतात. त्यावर निर्बंध लादत २० फूटांच्यावर हंडी लावण्यात मनाई करण्यात आली होती. तसे असतानाही २०१६ रोजी ठाणे जिल्ह्यात मनसेचे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांनी ४० फूटांवर हंडी उभारली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जाधव आणि पानसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आता पुन्हा दोघांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती.

त्या अर्जावर न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र दोघेही पोलिसांसमोर हजर झाले नाहीत म्हणूनच त्यांना दिलासा देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला असल्याचे सरकारी वकिलांकडून सागण्यात आले. त्यावर प्रकरण २०१६ मधील आहे गुन्हा दाखल झाल्यापासून तपास अधिकाऱ्यांनी तपासाचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि अचानक जाधव आणि पानसेंना पोलीसांकडून नोटीस बजावण्यात आली. हे एक राजकीय षडयंत्र आहे त्यामुळे अटक होण्याच्या भितीपोटी दोघेही पोलिसांसमोर हजर झाले नाहीत असा युक्तिवाद जाधव आणि पानसे यांच्यावतीने कऱण्यात आला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांची याचिका मान्य करत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Web Title: Bail to avinash jadhav and abhijeet panse nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2022 | 05:39 PM

Topics:  

  • avinash jadhav

संबंधित बातम्या

Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी
1

Avinash Jadhav: बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी, Video आला समोर
2

जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी, Video आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.