Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sugar Factory: वेळ पडली तर मी स्वतःला विकेन, पण ‘छत्रपती’ बंद पडू देणार नाही; पृथ्वीराज जाचक आक्रमक

पुणे जिल्ह्यात पहिला बॉयलर अग्निप्रतीपण समारंभ छत्रपती कारखान्याचा होत आहे, याचा आपणास आनंद आहे. ऊस तोडणी ऍडव्हान्स देणारा छत्रपती पहिला कारखाना आहे. या हंगामात साडेबारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 17, 2026 | 03:49 PM
Chhatrapati Sugar Factory

Chhatrapati Sugar Factory

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा भवानीनगर येथे उत्साहात संपन्न
  • पुणे जिल्ह्यात यंदाचा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा घेण्याचा मान छत्रपती कारखान्याला
    ‘वेळ पडल्यास स्वतःला विकेन पण कारखाना बंद पडू देणार नाही’ – अध्यक्ष पृथ्वीराज जाचक
Chhatrapati Sugar Factory:  “छत्रपती” चा मागील गळीत हंगाम दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांसह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्यामुळे पार पडू शकला, सध्या कारखाना अडचणीत असला तरी सर्वांच्या सहकार्याने तो अडचणीतून बाहेर काढला जाईल, पैशाअभावी छत्रपती कारखाना बंद पडू दिला जाणार नाही, वेळप्रसंगी मी स्वतःला विकेन मात्र छत्रपती बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही देत ऊस दराच्या बाबतीत अन्य कारखान्यांच्या तुलनेत छत्रपती मागे राहणार नाही, यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी बोलताना केले.

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नंबर १ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक निलेश टिळेकर व त्यांच्या पत्नी रश्मी टिळेकर यांच्या हस्ते तसेच युनिट नंबर २ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक संतोष मासाळ व त्यांच्या पत्नी वैशाली मासाळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आयोजित समारंभात जाचक बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, यांच्यासह इतर आजी-माजी संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

Pune Crime: पुण्यात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तरुणींना हॉटेलमध्ये डांबून ठेवून…

यावेळी अध्यक्ष जाचक म्हणाले, पुणे जिल्ह्यात पहिला बॉयलर अग्निप्रतीपण समारंभ छत्रपती कारखान्याचा होत आहे, याचा आपणास आनंद आहे. ऊस तोडणी ऍडव्हान्स देणारा छत्रपती पहिला कारखाना आहे. या हंगामात साडेबारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, सलग आठ वर्ष बारा लाखहून अधिक टन गाळप झाल्यानंतर कारखाना पूर्णपणे अडचणीतून बाहेर येईल. यावर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांनी सहकार्य केले आहे.

” छत्रपती” चा हंगाम १ ऑक्टोबरला जरी सुरू झाला तरी, सर्व यंत्रणा कारखान्याची सज्ज आहे. गेली दहा वर्षात प्रति टन ५०० रुपयाप्रमाणे दर कमी बसल्याचे गणित ग्राह्य धरले तर, तब्बल साडेतीनशे कोटी रुपये तोटा झाला आहे. अडचणीतील छत्रपती कारखाना बाहेर काढण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून सह वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध करत होतो, कारण हा प्रकल्प साखर कारखान्याचा फायद्याचा नाही. ज्या कारखान्यांनी हा प्रकल्प राबवला ते कारखाने तोट्यातच गेले आहेत, गुजरात मध्ये एकही कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प उभारत नाही.

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

सध्या साखरेचे दर वाढत आहेत, या हंगामात देखील साखरेचा दर ₹50 kg च्या आत मध्ये येणार नाही. छत्रपतीला निधी उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांच्या मुंबई दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. सध्या अडचणी असल्या तरी पैसे अभावी छत्रपती बंद राहणार नाही, वेळप्रसंगी हा पृथ्वीराज जाचक स्वतःला विकेल, आता छत्रपती बंद पडू देणार नाही. ऊस दराच्या बाबतीतही छत्रपती मागे राहणार नाही. मात्र सभासदांनी आपला ऊस छत्रपतीलाच गाळपास द्यावा, असे आवाहन जाचक यांनी यावेळी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर यांच्यासह जयराम रायते, ॲड संभाजीराव काटे, बाळासाहेब शिंदे, शंकरराव रुपनवर आदींनी आपल्या भाषणात विविध सूचना मांडल्या. प्रास्ताविकात या ऊस गळीत हंगामातील आढावा कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी घेतला. सूत्रसंचालन कामगार नेते युवराज रणवरे यांनी केले.आभार संचालक तानाजी शिंदे यांनी मानले. यावेळी संचालक अशोक पाटील,कैलास गावडे, सतीश देवकाते, ॲड शरद जामदार, पृथ्वीराज घोलप,  कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर आदींसह इतर मान्यवर व सभासद उपस्थित होते.

 

 

Web Title: Baramati newsprithviraj jachak statement chhatrapati sugar factory boiler agni ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.