बीड : विविध मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करूनही बीडचे प्रशासन दखल घेत नसल्याने काही आंदोलकांनी झाडावर चढून आंदोलन केले होते. मात्र याची दखल घेण्याऐवजी आंदोलन होऊ नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं वेगळी शक्कल लढवली आहे. झाडावर चढून आंदोलन होऊ नये जिल्हा प्रशासनाकडून थेट झाडं तोडण्याचीच मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेकदा आंदोलकांनी झाडावर चढून आंदोलन केली आहेत. अशी आंदोलनं पुन्हा होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाकडून थेट झाडं तोडण्याचीच मोहीम हाती घेण्यात आलीय. जिल्हाधिकारी कचेरीसमोरील कडूनिंबाचे झाड सर्वात आधी कापण्यात आले त्यानंतर आता प्रत्येक कार्यालयासमोरील झाडावर कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीपासून ते तहसील कार्यालयासमोरील सर्वच झाडे आता तोडण्यात येत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या धास्तीमुळे वृक्ष तोडणी होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.
[read_also content=”शाळांमध्ये भगवदगीतेचे पठण होणार नसेल तर ‘फ़तवा-ए-आलमगीरी’ पठण करायचं का? नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना पत्र https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/nitesh-rane-wrote-a-latter-to-udhhav-thackeray-on-permisson-of-bhagwat-gita-sung-in-school-nrps-241932.html”]