बीड : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी छत्रपती खासदार संभाजीराजे हे 26 फेब्रुवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. मुळात सरकारने छत्रपतींना उपोषण करण्याची वेळ येऊ द्यायची नसताना आज तीन दिवसानंतर देखील सरकारकडून छत्रपतींच्या आंदोलनाची दखल घेतल्याचे दिसून येत नसल्याने राज्यभरात मराठा समाज पेटत असून याबाबत आज गेवराई येथील मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने बैठक आयोजित करून सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरला यामध्ये गेवराई येथील शास्त्री चौक येथे संभाजी राजेंना पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
[read_also content=”प्रयोगशाळेत रमणारे सी व्ही रामन यांच्या हातून कसा घडला ‘रामन आविष्कार’ https://www.navarashtra.com/latest-news/dinvishesh/on-the-occasion-of-science-day-lets-find-out-about-the-talented-scientist-cv-raman-nrps-246555.html”]
सकाळी सर्व समाज बांधवांनी एकत्र येत शास्त्री चौक येथून थेट तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यावर घोषणाबाजी निवेदन दिले. यानंतर शास्त्री चौक येथे प्रातिनिधिक स्वरूपात सात बांधवांनी उपोषण सुरू केले आसून तालुकाभरातील बांधवांनी याला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी गर्दी केली आहे. या उपोषणात सचिन मोटे, स्वप्निल मस्के, साहिल देशमुख, गोरख मोटे, राहुल चाळक, धनराज मुळे, नारायण हिंगे या मावळ्यांनी आंदोलन सुरू केले असून सकल मराठा समाज बांधवांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे.तर दुसरीकडे तालुक्यातील धोंडराई येथेही खासदार महाराज संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणुन मराठा समाजबांधवांकडुन एकदिवसीय उपोषण करण्यात आले.
[read_also content=”तब्बल १८७ वर्षांनंतर काशी विश्वनाथ मंदिराला पुन्हा सुवर्ण झळाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्तुती – पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/kashi-vishwanath-temple-is-gold-plated-after-187-years-prime-minister-narendra-modi-praised-the-beauty-nrsr-246663.html”]