मुंबईत निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख आणि ठिकाण ठरलं
Beed Sarpanch Murder Case Marathi: ९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली, परंतु एक आरोपी अजूनही फरार आहे. तसेच वाल्मिकी कराड खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला असून तोही पोलीस कोठडीत आहे. त दुसरीकडे दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करत आपण मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा काल दिला होता. त्यामुळे आज मस्साजोगमधील दोन्ही मोबाइल टॉवरभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. त्यामुळे धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकी गाठली आणि त्यावर चढून सध्या देशमुख यांचे आंदोलन केले. यावर आता संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. दरम्यान यावर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. वैभवी देशमुख प्रतिक्रिया देताना म्हणाली, “माझ्या वडिलांना उचलून नेले. आता काकाला काही झाले तर कोण जवाबदार? आज काका वर गेला आहे. वडिलांच्या आरोपींना अटक झाली नाही तर, यांचे संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल. एक माणूस गेलाय तर प्रशासन आरोपींना पकडू शकत नाही. आमचे सर्व कुटुंब गेल्यावर ते कारवाई करणार आहेत का?” असा संतप्त सवाल वैभवी देशमुखने केला आहे.
हेही वाचा: Dhananjay Deshmukh : मोबाईल टॉवरभोवती बंदोबस्त, आंदोलनासाठी धनंजय देशमुख चढले पाण्याच्या टाकीवर
वाल्मिकी कराडावर मकोका लावून सरपंच हत्येप्रकणात त्याला सहआरोपी कराव, मोकट कृष्णा आंधळेला अटक करावी, शासकीय वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करा, एसआयटी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करते, तपासाची सर्व माहिती देशमुख कुटुंबीयांना द्या , पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सहआरोपी करा, या मागण्याचे निवदेन गावकऱ्यांनी तयार केले आहे.
६ डिसेंबर: मसाजोग पवनचक्की येथे संतोष देशमुख यांचा वाद
९ डिसेंबर: सरपंच संतोष देशमुख यांची हत्या.
१० डिसेंबर: बीडमध्ये रस्ता रोको आंदोलन.
११ डिसेंबर: आरोपी प्रतीक घुले गुन्हे शाखेच्या ताब्यात.
१३ डिसेंबर: प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.
१८ डिसेंबर: आरोपी विष्णू चाटेला अटक.
१९ डिसेंबर: हत्येची पद्धत उघडकीस आली, संतोष देशमुख यांना निर्घृण मारहाण करण्यात आली.
२१ डिसेंबर: पोलिस अधीक्षक अविनाश बर्गल यांची बदली, नवनीत कांत नवीन पोलिस अधीक्षक बनले.
२४ डिसेंबर: सीआयडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
२८ डिसेंबर: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय निदर्शने.
३ जानेवारी: आणखी दोन आरोपींना अटक.
६ जानेवारी: शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
७ जानेवारी: देशमुख कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटले.