मुंबई : मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची दुसऱ्यांदा पोलिसांत चौकशी (Police Inquiry) झाली, या बँकेत दरेकर संचालकपदी असताना दरेकरांनी दोन हजार कोटीचा घोटाळा केला आहे. तसेच बँकेची व खातेदारांची फसवणूक केली आहे. त्यामुळं दरेकरांवर गुन्हा दाखल होऊन, दरेकरांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली आहे, जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषद (Bhai Jagtap Press Conference) घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
[read_also content=”योगींची मोठी अचिव्हमेंट! भाजपाच्या सर्वोच्च संसदीय मंडळात लागली वर्णी; भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत https://www.navarashtra.com/india/great-achievement-of-yogi-bjps-top-parliamentary-board-strong-contender-for-the-pms-post-nrvk-267482.html”]
दरम्यान, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेतील घोटाळ्या प्रकरणी रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाली. चौकशीवेळी समर्थकांची गर्दी जमवून पोलीस स्टेशनबाहेर ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या गेल्या. ‘वंदे मातरम’ हे पवित्र शब्द आहेत. या पवित्र शब्दांचा वापर भाजपा आरोपींना वाचवण्यासाठी करत आहे हे दुर्दैवी. तसेच तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, कायद्याच्या चौकटीत जे होईल त्याला सामोरे जावे, दोषी असतील तर त्यांना शिक्षाही होईल. त्यासाठी दबाव आणणे, चौकशीपासून पळ काढणे हे कशासाठी? असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, दररोज विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करणारे सोमय्या स्वतःवर कारवाईची वेळ आली की गायब झाले, दोन दिवसांपासून ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली सोमय्या यांनी देशभावनेशी खेळ केला आहे. किरीट सोमय्या यांच्या ‘आयएनएस विक्रांत बचाव’ निधी प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. सोमय्या पिता पुत्र दोघांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावले असता ते चौकशीला हजर झाले नाहीत. निरव मोदी, विजय माल्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते पळून गेले तसेच सोमय्याही पळाले आहेत का? पळून जाण्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे. ते कुठे गायब आहेत, कुठे गेले याचा माध्यमांनी शोध घ्यावा असं जगताप यांनी म्हटले.