Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

दक्षिण मुंबईत असे अनेक पूल आहेत, ज्यांची नावे ब्रिटिशकालीन आहेत. असाच एक पूल म्हणजे बेलासीस. नुकतेच या पुलाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 10:02 PM
मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'

मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नामांतर
  • ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
  • राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश
दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचे नामांतर करून त्याला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयास माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी मंजुरी दिली असून, राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबईचे सहपालकमंत्री Mangal Prabhat Lodha यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

या पुलाचे पूर्वीचे नाव ब्रिटिश अधिकारी मेजर जनरल जॉन बेलासिस यांच्या नावावर होते. ब्रिटिशकालीन खुणा दर्शवणारे हे नाव बदलावे, यासाठी मंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सरकारने सकारात्मक निर्णय घेत पुलाला ‘पुण्यश्लोक Ahilyabai Holkar’ यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला.

पुनर्बांधणी पूर्ण; २६ फेब्रुवारीला उद्घाटन

मोडकळीस आलेल्या बेलासिस पुलाची पुनर्बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे. या पुलाचे उद्घाटन गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

वसाहतकालीन नावांना पर्याय

या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना मंत्री लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील सरकार वसाहतकालीन काळाच्या आठवणी पुसून भारतीय वारशाचा सन्मान करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये मुंबई महानगरपालिकेने जुन्या कर्नॅक पुलाचे नामांतर ‘सिंदूर ब्रिज’ असे केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

दरम्यान, कौशल्य विकास विभागाने राज्यातील सर्व आयटीआय संस्थांना थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

Web Title: South mumbai belasis bridge is now named punyashlok ahilyadevi holkar mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
1

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
2

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
3

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
4

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.