Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आधीच काँग्रेसनं भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदावरुन भाई जगतापांना हटवले; अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, जगताप म्हणतात मला…

मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरुन हटवले आहे, तर नवीन अध्यक्ष म्हणून माजी मंत्री व आमदार वर्षाताई गायकवाड यांची नियुक्ती केली आहे, तसे पत्रकच पक्षश्रेष्ठींनी काढले आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 10, 2023 | 09:56 AM
निवडणूक आधीच काँग्रेसनं भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदावरुन भाई जगतापांना हटवले; अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, जगताप म्हणतात मला…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – निवडणुका आधीच मुंबई काँग्रेसनं भाकरी फिरवली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकीच्या (Election) धरतीवर सर्वंच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. तर मुंबईत पालिका (BMC) निवडणुकीची रणनिती आखली जात असताना, आणि काँग्रेस मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरुन हटवले आहे, तर नवीन अध्यक्ष म्हणून माजी मंत्री व आमदार वर्षाताई गायकवाड यांची नियुक्ती केली आहे, तसे पत्रकच पक्षश्रेष्ठींनी काढले आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळं पक्षाने अचानक भाई जगताप यांची उचलबांगडी का केली, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दलित चेहरा म्हणून गायकवाड यांची नियुक्ती

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर दलित चेहरा देण्यात यावा म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणारे भाई जगताप यांना अचानक पक्षाने का हटवले यावर चर्चा होत आहेत. दरम्यान, “जाती धर्म बघून कधीही काँग्रेसने निर्णय घेतले नाहीत. या गोष्टीचा आणि विचारांचा मला अभिमान आहे.” अशी प्रतिक्रिया भाई जगतापांनी दिली आहे.

काँग्रेसनं माझ्याशी चर्चा केली नाही

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर भाई जगताप यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ गायकवाड यांच्याशी बोलूनच माझीही नियुक्ती करण्यात आली होती. पण यावेळी माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. आठवडाभर ही चर्चा सुरु असून, नेत्यांशी बोलूनच हा निर्णय झाला आहे. कृपाशंकर सिंह, संजय निरूपम, मिलिंद देवरा यांच्याशी चर्चा करूनच अन्य लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. पण याबाबत मला कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती, असं जगताप म्हणाले. मुंबई काँग्रेस एका महिलेला संधी देते, याचा मला आदर आणि अभिमान आहे, असं भाई जगताप म्हणाले.

Web Title: Bhai jagtap was removed from the post of mumbai congress president appointment of varsha gaikwad as president jagtap says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2023 | 09:56 AM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
1

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका
2

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

Rahul Gandhi Loksabha Live : “ही ट्रेड डील नाही तर…; अमेरिकेच्या करारावर राहुल गांधींचा संसदेमध्ये जोरदार प्रहार
3

Rahul Gandhi Loksabha Live : “ही ट्रेड डील नाही तर…; अमेरिकेच्या करारावर राहुल गांधींचा संसदेमध्ये जोरदार प्रहार

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका
4

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.