पिंपरी : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली. पिंपरी चिंचवड़ शहरातील काळेवाडी परिसरात एका फ्लैट मध्ये सुरू असणाऱ्या ‘बेटिंग’च्या अड्डावर गुंडा विरोधी पथकाने छापा मारून २७ लाख २५ हजार रुपये, आठ मोबाईल, बेटिंग खेळण्यासाठी-घेण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. यात एका हिस्ट्रीशीटर ने आपली ‘पहुंच’ असल्याचे सांगत कार्रवाइत अडथळा निर्माण केला( Big action against IPL bettors in Pune Three arrested with a history sheeter and Rs 27 lakh cash seized ).
या प्रकरणी हजरतअली पठाण यांनी फिर्याद दिली असून सनी गिल, रिकी राजेश खेमनानी (36, पिंपरी), सुभाष रामकिसन आगरवाल (57, रा. पिंपरी) या तिघांना अटक केली आहे तर सनी सुखेजा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील सनी गिल हा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आयपीएलच्या या सिझिनमध्ये शहरात पहिलीच मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. कारवाईनंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर हे घटनास्थळी पोहचले होते.
आयपीएलच्या गुजरात टायटन आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यांवर बेटिंग सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. काळेवाडी येथील एका सोसायटीमध्ये घरात सुरू असलेल्या बेटिंगवर गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने आणि त्यांच्या पथकाने छापा मारला. घरात रंगेहाथ बेटिंग घेताना-खेळताना पोलिसांनी पकडले. मोठ्या प्रमाणात पैसे आणि इतर साहित्य आढळून आले.
या दरम्यान पोलीस कारवाई करत असताना यातील आरोपी सनी उर्फ भूपेंद्रसिंह गिल (३८, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ‘मला हात लावायचा नाही, माझी ओळख वर प्रयत्न आहे, माझ्यावर कारवाई केल्यास चांगले होणार नाही’ अशी धमकी देत पोलिसांसोबत झटापटी करत कारवाई करताना अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केला आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]