पुणे : भाजप आमदार (BJP Mla) आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Ex Mayor Mukta Tilak) यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यांना कर्करोगाचं निदान (Cancer) झालं होतं त्यावर त्या उपचार घेत होत्या आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात (Galaxy Care Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु होते, येथेच त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात पुणे शहराचे महापौरपद भूषवलं होतं. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरॲम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं.
[read_also content=”अधिकारांवर गदा! डागडुजीसाठी पालिका रुग्णालयातील अधिष्ठातांचे केवळ तीन लाखापर्यंतचेच अधिकार; ३ लाखाच्यावर खर्च करण्यासाठी घ्यावा लागणार मेंटेनन्स विभागाचा सल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/authority-of-bmc-hospital-authorities-only-up-to-three-lakhs-for-repairs-to-spend-more-than-3-lakhs-the-advice-of-the-maintenance-department-should-be-taken-nrvb-355774.html”]
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाले. एक अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/BHV1qr9vas
— Supriya Sule (@supriya_sule) December 22, 2022
मुक्ता टिळक यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं पुढे त्या एमबीए देखील झाल्या. सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मानही त्यांच्या नावावर आहे.
पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहता भाजपनं त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्या.