देशभरात भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत उत्सुकता वाढू लागली आहे. यावेळी कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असतानाच महाराष्ट्रासह देशभऱातील भाजपशासित राज्यातील पुढील काही तासांत प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. तर पुढील दोन दिवसांत १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तराखंड आणि मिझोरम भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची निवडणूक झाली. उत्तराखंडमध्ये, विद्यमान अध्यक्ष महेंद्र भट्ट पुन्हा अध्यक्ष झाले, तर मिझोरममध्ये माजी मंत्री आणि आमदार के. बेचुआना यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. सोमवारी सहा राज्यांमध्ये भाजप अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या, तर आतापर्यंत वीस राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत.
Krishnarao Bhegde passes away: मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन
सोमवारी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मिझोराम, पुद्दुचेरी येथे प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात आल्या. जे आज जाहीर केले जाईल. पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश, लडाख आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. आतापर्यंत १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. म्हणजेच २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका पूर्ण होतील. उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील. यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
महाराष्ट्राचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी औपचारिकपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते आता पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना महाराष्ट्र निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
जगातील एकमेव असा देश जिथे वर्षाला असतात १३ महिने, जगाच्या ७ वर्षे मागे आहे हे ठिकाण
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची तेलंगणामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येथे एन रामचंद्र राव यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसल्याने त्यांची निवड जवळजवळ निश्चित आहे. विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष आणि करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपासून भाजप संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
जातीय समतोल आणि संघटन बांधणीवर भर
तेलंगणामध्ये रामचंदर राव यांची निवड झाल्यानंतर पक्षाचे आक्रमक नेते टी. राजा सिंग यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. तिथल्या संघटनातील अंतर्गत तणाव आणि संघर्ष सांभाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि एन.टी. रामाराव यांची कन्या पुरंदेश्वरी यांच्याऐवजी माधव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे, कारण भाजप ही तेलुगू देशम पक्षाची (TDP) सहयोगी असली तरी निवडणूकांच्या दृष्टीने ती तिथे तुलनेने कमकुवत आहे.