(फोटो सौजन्य: Pinterest)
संपूर्ण जग हे कॅलेंडरनुसार चालत असत. प्रत्येक देशाचं केलेंडर वेगळं मात्र महिने हे सारखेच असतात. भारताच्या कॅलेंडरमध्येही एकूण १२ महिने असतात आणि यांनतर वर्षाची समाप्ती होत. बहुतेक देशांमध्ये वर्षाला १२ महिनेच असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील असा एक अनोखा देश सांगणार आहोत जिथे वर्षाला १२ नाही १३ महिने असतात. आपल्या या निराळ्या कॅलेंडरमुळे हे ठिकाण इतर देशांपेक्षा ७ वर्षे मागे आहे. या आगळ्यावेगळ्या देशाचे नाव आहे इथिओपिया. इथे गीझ कॅलेंडर वापरला जातो ज्यात १३ महिने असतात. इथिओपिया हा पूर्व आफ्रिकेत स्थित एक देश आहे. हा देश आफ्रिकेच्या शिंगात स्थित आहे आणि सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. या देशाच्या दक्षिणेस केनिया, पूर्वेस सोमालिया आणि पश्चिमेस आणि दक्षिणेस सुदानसारखे देश आहेत.
१३ महिने का असतात?
इथिओपियामध्ये १२ महिन्यांचा नाही तर १३ महिन्यांचा वर्ष असतो. पहिले १२ महिने हे प्रत्येकी ३० दिवस असतात तर १३ व्या महिन्यात पगुमे असतो ज्यात लीप वर्षानुसार पाच किंवा सहा दिवस असतात. ही प्रणाली प्राचीन गीझ कॅलेंडरवर आधारित आहे, जी अजूनही तेथील धार्मिक, सांस्कृतिक आणि कृषी कार्यात वापरली जाते.
नवीन वर्ष कधी साजरे केले जाते?
आम्ही तुम्हाला सांगतो की, जगातील इतर देशांमध्ये जसा जानेवारीमध्ये नवीन वर्ष साजरा केला जातो तसे इथिओपियामध्ये होत नाही. इथे ११ सप्टेंबर रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. नवीन वर्षाची सुरुवात इथे फक्त एक संस्कृतीत उत्सव नाही तर इथल्या लोकांसाठी ते नवीन वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.
जगापेक्षा ७ वर्षे मागे का आहे?
आपल्या अनोख्या कॅलेंडरमुळे हा देश इतर देशांतून ६ वर्षे मागे आहे. इथिओपिया अजूनही २०१७-२०१८ मध्ये राहत आहे कारण इथिओपियामध्ये १३ महिन्यांचे वर्ष आहे. याचे कारण येशू ख्रिस्ताच्या जन्माची वेगवेगळी गणना आहे. इथिओपियामध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅलेंडरनुसार, येशूचा जन्म ७-८ वर्षांनी झाला असे मानले जाते. हेच कारण आहे की इथिओपिया इतर देशांपेक्षा सात वर्षे मागे आहे.
लवकरच सुरु होणार अमरनाथ यात्रा, बाबा बर्फानीचे दर्शन कसं मिळणार? सर्व माहिती जाणून घ्या
गीझ कॅलेंडर म्हणजे काय आहे?
गीझ कॅलेंडर हे फक्त वेळ सांगण्याचा मार्ग नाही, तर ते इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्च, ग्रामीण जीवन आणि सणांचा आधार आहे. इथले लोक ते अभिमानाने स्वीकारतात आणि त्यानुसार त्यांचे जीवन जगतात. इथिओपिया आपल्याला आठवण करून देतो की कॅलेंडर ही देखील एक मानवी निर्मिती आहे, जी त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेशी जोडलेली आहे. तुम्ही जेव्हा या देशाला भेट द्याल तेव्हा तुम्हाला फक्त नवीन संस्कृतीचाच अनुभव नाही येणार तर तुम्हाला हेही जाणवेल की तुम्ही काळाच्या गतीला एक नवीन रूप देत आहात.