Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आखली ‘ही’ रणनीति; ‘या’ चार नेत्यांकडे असणार कमान?

आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मराठा, ओबीसी, दलित आणि आदिवासी असे चार नेते निवडणूक प्रचाराची कमान सांभाळणार आहेत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजपने पक्षापासून दूर गेलेला आपला पारंपरिक मतदार जवळ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2024 | 07:15 AM
विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसलं तरीही यंदा विरोधी पक्षनेता असणार? काय सांगतो नियम?

विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसलं तरीही यंदा विरोधी पक्षनेता असणार? काय सांगतो नियम?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभवाची कसर भरून काढण्यासाठी भाजप नेतृत्वाने खास रणनीती आखली आहे. भाजपपासून दूर गेलेल्या मतदारांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला जाणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मराठा, ओबीसी, दलित आणि आदिवासी असे चार नेते निवडणूक प्रचाराची कमान सांभाळणार आहेत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजपने पक्षापासून दूर गेलेला आपला पारंपरिक मतदार जवळ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवताना सर्वच समाजघटकांना स्थान दिले जाणार आहे.

नारायण राणे, पंकजा मुंडेंकडे येणार जबाबदारी?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली जाणार असली तरी मराठा, ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजात प्रभाव असणाऱ्या त्या समाजातील चार नेत्यांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यात नारायण राणे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश असणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दलित आणि आदिवासी समाजातील दोन नेते असणार आहेत. हे चारही नेते यात्रांच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

विधानसभेसाठी व्यूहरचना

मराठा, ओबीसी पारंपारिक मतदार मध्यमवर्गीय वर्ग हा भाजपचा पारंपारिक मतदार आहे. त्यातही मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मागील लोकसभा निवडणुकीत हा मतदार दूर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी अनुक्रमे नारायण राणे आणि पंकजा मुंडे यांना पुढे केले जाणार आहे.

राणे समितीच्या शिफारशीवरच मराठा समाजाला आरक्षण

नारायण राणे यांची मराठा नेता अशी ओळख आहे. नारायण राणे समितीच्या शिफारशीवरच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. याशिवाय पंकजा मुंडे यांची ओबीसी नेता अशी ओळख आहे. भटक्या-विमुक्तांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. त्याचा फायदा करून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Web Title: Bjp preparation for upcoming maharashtra assembly election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 07:10 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.