Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
नागपूर: राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. हायकोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान त्यांच्या विजयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी फडणवीस यांना समन्स जारी करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या विरोधात कॉँग्रेसच्या प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांचा 39,710 मतांनी पराभव केला होता.
कॉँग्रेसच्या प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी याचिकेतून देवेंद्र फडणवीस यांचा विजय अमान्य करावा अशी मागणी केली होती. याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाच्या खंडपीठाने देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. या नोटीशिवर 8 मे पर्यन्त उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या वर्षी राज्यात झालेल्याविधानसभा निवडणुकीत नियमांचे पालन झाले नाही आस या याचिकेत म्हणण्यात आले होते. या निवडणुकीत महायुतीने 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले.
दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याच प्रकारे नागपूर पश्चिमचे भाजपा आमदार मोहन मते आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर मतदारसंघातील कीर्तिकुमार भांगडिया यांना देखील अशाच प्रकारे समन्स बजावले आहे.
फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण
राज्यामध्ये महायुती सरकारकडून अनेक विकास कामांचे लोकार्पण होत आहे. आता अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळ लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यनमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते उपस्थित होते.
अमरावतीमधून बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आमचे सरकार डबल इंजिन सरकार नव्हे तर दाबलंन बूस्टर सरकार आहे. त्यामुळेच आपले सरकार वेगाने चालले आहे. आम्ही तिघेही राज्याचा विकास करत आहोत. आपल्याला राज्याला विकसित करायचे आहे. अमरावतीच माझ्यावर कर्ज आहे. माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे अमरावतीशी माझं विशेष नाते आहे. अमरावतीमध्ये काही झाले तर सर्वाधिक आनंद माझ्या आईला होतो.”