Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uday Samant News: भाजप-शिंदेसेनेची अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उदय सामंतांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी

खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील फेरफार आणि अनियमितेतबाबत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर आरोप केले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 12, 2025 | 10:42 AM
Uday Samanta's statement sparks new controversy between BJP and Shinde Sena

Uday Samanta's statement sparks new controversy between BJP and Shinde Sena

Follow Us
Close
Follow Us:
  • उदय सामंतांची भाजपवर टीका
  • शिंदेसेना-भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी
  • आरोप करण्यापूर्वी राहुल गांधींनी राजीनामा देण्याचे आव्हाने

गेल्या काही महिन्यांपासून महायुतीतील शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावाही अनेकदा दिसून आला. त्यातच शिंदे सेनेतील मंत्र्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीदेखील चांगलीच अडचणीत आली होती. या सगळ्यात आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक वक्तव्य करत खुलेआम भाजपला डिवचल आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेसह राज्याच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. त्यामुळेच जनतेने मतदानातून प्रतिसाद दिला, असा दावा सामंतांनी केला आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची काल आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चांगले नियोजन करावे, चांगले काम कऱण्याचा सल्ला दिला. तसेच ही निवडणूक पक्षाच्या राजकीय प्रभावासाठी दखील महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची असल्याचे त्यांनी सांगितले.

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट

उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे, त्यात काही गैर नाही. आगामी काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आम्हाला निश्चितच आवडेल. त्यासाठी सहकारी, आणि विरोधक या दोघांनीही राग व्यक्त करण्याची गरज नाही.

यावेळी बोलताना सामंत यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विरोधक संपले, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीत राहिलेले विरोधकही संपुष्टात येतील आणि या निवडणुकीच्या निकालातून एकनाथ शिंदे यांचे राजकीय भवितव्य पुन्हा अधोरेखित होईल, असा दावा सामंत यांनी केला.

गजराजाला छेडणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, धावत पळत आला अन् पायदळीच तुडवला जीव; थरारक Video

तसेच खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील फेरफार आणि अनियमितेतबाबत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी यांच्या आरोपांना आव्हान देत राहुल गांधी आणि त्यांचे खासदारही ईव्हीएममुळेच लोकसभेत पोहचले. त्यामुळे आंदोलन करण्याआधी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे, असे आव्हान सामंत यांनी केले.

 

Web Title: Bjp shinde sena internal dispute is back on the agenda uday samantas statement sparks a new controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 10:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.