Bhivandi BJP Leader Murder
भिवंडी शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता धारदार शस्त्राने भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या झालेल्यांमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाचा समावेश असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
Maharaja T20 Trophy 2025 : 6,6,6,6… मनीष पांडेचा मैदानावर धुमाकूळ! संघाला मिळवून दिला विजय
प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या दोघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तर धीरज तांगडी गंभीर जखमी असून, त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार ते पाच हल्लेखोरांनी या तिघांवर अचानक हल्ला चढवला. प्रफुल्ल तांगडी यांच्यावर एका वर्षापूर्वी हल्ला झाला होता. पण यावेळी झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी यांनी जीव गमावला. पण या हत्येमुळे स्थानिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यानघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला.
घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तर जखमी धीरज याचाही जबाब नोंदवला जाणार आहे. खार्डी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत असून, कसून तपास सुरू आहे. प्रफुल्ल तांगडी आपल्या जे. डी. टी. इंटरप्रायझेस कार्यालयात दोन सहकाऱ्यांसह बसले असताना चार ते पाच हल्लेखोरांनी अचानक तिथे धडक मारत धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात प्रफुल्ल आणि तेजस यांचा जागीच मृत्यू झाला, तर धीरज तांगडी जखमी झाला.
क्रिकेट खेळण्यावरून झाला वाद; व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून हातपाय तोडले अन् मुलांनाही…
प्रफुल्ल तांगडी हे भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या हत्येमागचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली की राजकीय वैमनस्यातून, याची चौकशी सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.