गोंदियातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली. व्हाट्सअप ग्रुपवरील चिठ्ठी पाहताच मित्रांनी त्याच्या रूममध्ये धाव घेतली, आणि विद्यार्थ्याचे प्राण वाचविले. त्याच्यावर गोंदिया येथील वैधकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
क्रिकेट खेळण्यावरून झाला वाद; व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून हातपाय तोडले अन् मुलांनाही…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्या विद्यार्थ्याने हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली व त्यानंतर गळफास घेतला. मात्र ती चिठ्ठी वर्ग मित्रांनी बघताच तो राहत असलेल्या रूमवर त्यांनी धाव घेतली, आणि त्याचे प्राण वाचविले. विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे.
ही घटना गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील भाड्याच्या खोलीत रविवारी मध्यरात्रीनंतर 1.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाव आवेश कुमार (२२ वर्षीय) आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. सिव्हिल लाइन्स परिसरातील शीतला माता मंदिर चौकात आवेश भाड्याच्या खोलीत राहत होता. आवेशने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी व्हाट्सअॅपला मॅसेज केला होता. त्याचा हा मॅसेज येताच त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या खोलीवर धाव घेत त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून काढून उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
चिठ्ठीत काय?
वारंवार तक्रार करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्याने सांगितलं आहे. “मी स्वतः रुग्ण असून सहानुभूतीची अपेक्षा होती, मात्र मला अपमानास्पद वागणूक मिळाली. मी चूक केली, पण ती इतकी मोठी नव्हती की त्यासाठी माझ्या आई व कुटुंबाबद्दल नको ते बोलावं,” असे त्याने त्या पत्रात लिहिलं असून, संबंधित वर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. या चिठ्ठीत त्याने एका प्राध्यापकाच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी