Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूरमध्ये विद्यमान आमदारांना संधी मिळणार की ‘या’ नेत्याचा विचार होणार? पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले लक्ष

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2024 | 09:43 PM
पंढरपूरमध्ये विद्यमान आमदारांना संधी मिळणार की 'या' नेत्याचा विचार होणार? पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले लक्ष

पंढरपूरमध्ये विद्यमान आमदारांना संधी मिळणार की 'या' नेत्याचा विचार होणार? पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर/नवनाथ खिलारे:  मतदार संघात विद्यमान आमदार हेच महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दुसरीकडे या मतदार संघातून मा. आ. प्रशांत परिचारक राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने परिचारक स्वताच प्रचार यंत्रणा राबविताना दिसत आहेत. तसेच मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०१९ मध्ये परिचारक हे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. मात्र, देवेंद्र फडणवीस त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी पुढच्या वेळी निवडणूक लढणार असल्याचे परिचारकांनी संकेत दिले होते. सध्याच्या घडीला या मतदार संघात समाधान आवताडे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. यामुळे परिचारक बंडाचे निशाण फडकविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अभी नहीं तो कभी नहींः प्रशांत परिचारक यांचा नारा
लोकसभा निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांनी खासदार राम सातपूते यांना निवडून आणण्यात अपयश आले असले. तर दुसरीकडे परिचारक यांनी पक्ष सावरण्याचे तसेच कार्यकर्त्यांचे मोठमोठे मेळावे घेऊन त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षनेत्वृत दखल घेऊन आपल्याला उमेदवारी देईल अशी आशा परिचारक यांना आहे. यामुळे त्यांनी अभी नहीं तो कभी नही असा नारा दिला आहे. यावर ते निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यावर पक्षनेत्वृत्व काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
प्रशांत परिचारकांबाबत काय निर्णय होणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामुळे कालपासूनच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाविकास आघाडी वा महायुतीकडून जागावाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आघाडी आणि युतीमध्ये जागावाटपात पेच निर्माण झाला असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. यातच अनेकजण पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी मिळणार या आशेने अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे. यामुळे या पक्षात इन्कमिंग बाढले असल्याचे पाहिला मिळत आहे. अशा राजकीय वातावरणात प्रशांत परिचारक बाबत काय निर्णय होतो त्यावर परिचारक कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.
युती आणि आघाडीकडून इच्छुकांकडून तयारीला सुरूवात महायुतीकडून आमदार समाधान आवताडे तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीमधून अनिल सावंत इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. ते देखील कार्यकर्ते मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन करीत आहेत. राष्ट्रवादीमधून वसंतराव देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे.  यामुळे महायुतीमध्ये अनेकजण इच्छुक असल्याचे पाहिला मिळत आहेत. यावर पक्षश्रेष्ठ काय निर्णय घेणार यावर महायुतीकडून कोण निवडणूक लढणार हे ठरणार आहे.
इच्छुक अनेक संधी कोणाला?

२००९ मध्ये  काँग्रेस पक्षाचे  हे या मतदार संघातून आमदार झाले होते. त्यानंतरच्या काळात दोन टर्म या मतदारसभांचे प्रतिनिधीत्व स्वर्गीय आमदार भारत  भालके यांनी केले होते. त्यानंतरच्या काळात म्हणजेच २०१९ मध्ये ही जागा भाजपाने लढवून येथून समाधान आवताडे हे आमदार झाले. सध्याच्या घडीला पंढरपूर- मंगळवेढा आघाडी आणि युती दोन्हींकडून इच्छुक उमेदवार अनेक आहेत. यामुळे कोणाला संधी मिळते हे पाहवे लागणार आहे.
यंदाची निवडणूक चुरशीची होणार…!

विद्यामान आमदार तालुक्यातील गावात भेटी देत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना दिसत आहे. परिचारक देखील गावभेट दौऱ्यात व्यस्त आहेत. विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. अनिल सावंत यांनी स्वःताह प्रचार यंत्रणा राबवली असून, गावोगावी जात अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच तालुक्यात अनेक कार्यक्रम ते घेत आहेत. यामुळे पंढरपूर- मंगळवेढा विधान सभेची निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे जाणकार सांगतात.

Web Title: Bjp who will give chance to samadhan autade or prashant paricharak in pandharpur constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 09:43 PM

Topics:  

  • Samadhan Autade

संबंधित बातम्या

रेल्वे पुलाखालील रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करा; आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
1

रेल्वे पुलाखालील रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करा; आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.