Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vicky Kaushal : “पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने सादर केली कुसुमाग्रजांची कविता अन् अस्खलित मराठीतून भाषण

कुसुमाग्रजांची कणा कविता छावा चित्रपटाचा नायक विकी कौशल याने सादर करत आज मराठी माणसांची मने जिंकली. निमित्त होतं मराठी भाषा गौरव दिनाचं.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 27, 2025 | 10:20 PM
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता अन् अस्खलित मराठीतून भाषण

“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता अन् अस्खलित मराठीतून भाषण

Follow Us
Close
Follow Us:

ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरटयात राहून

माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी माञ ठेवले

कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा…

कुसुमाग्रजांची ही कविता छावा चित्रपटाचा नायक विकी कौशल याने सादर करत आज मराठी माणसांची मने जिंकली निमित्त होतं मराठी भाषा गौरव दिनाचं.

महाराष्ट्रात आज २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. या मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने कवितांची मैफीलही रंगली. यावेळी राज ठाकरे, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यांसह अनेक दिग्गज उपस्थित होते.

यावेळी विकी कौशलने कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता सादर केली. “इथे एक एक लोक कविता सादर करत होते. त्यावेळी आशा मॅम यांनी खूपच घाबरत माझ्याकडे पाहिले आणि त्यांनी मला विचारले की तू पण कविता वाचणार आहेस का? मी त्यांना सांगितले हो… त्यांनी परत विचारले मराठीत? मी म्हटलं हो…त्या म्हणाल्या तोबा तोबा…. मी प्रयत्न करतो. कवितेचे नाव कणा.. राज ठाकरेंनी जेव्हा मला सांगितलं की कुसुमाग्रज यांची एक कविता कणा तुम्हाला म्हणायची आहे. मी त्यांना विचारले सॉरी पण कणा याचा अर्थ काय असतो. त्यावर त्यांनी म्हटलं कणा म्हणजे स्पाईन… छावा हा चित्रपट केल्यानंतर मला या शब्दाचा अर्थ समजला”, असा किस्सा विकी कौशलने सांगितला.

विकी कौशलने मराठीतून भाषणाची सुरुवात केली. जय भवानी जय शिवराय, खरं सांगू तर मला आता खूप नर्व्हस वाटतं. मी मराठीत बोलू शकतो. दहावीपर्यंत मराठी शाळेत शिकलो. दहावीत मराठीत जास्त मार्क होते, हिंदीत कमी होते. पण इतकी चांगली नाही. त्यामुळे चुकीला माफी असावी. जावेद सरांनंतर इथे येणं आणि मराठीत कविता म्हणणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात नर्व्हस क्षण आहे. नॉन महाराष्ट्रीयन असूनही ज्याचे संगोपन महाराष्ट्रात झाले, ज्याचे शिक्षण महाराष्ट्रात झाले, जो काम महाराष्ट्रात करतो आणि आज तो या मंचावर असणं मराठी भाषा दिनाच्या दिवशी शिवाजी पार्कात असणं ही खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. राज ठाकरे तुम्ही मला हा मान दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, असे विकी कौशल म्हणाला.

Web Title: Bollywood actor vicky kaushal presented kusumagraj kana poem in marathi rajbhasha din

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 10:12 PM

Topics:  

  • Chhaava Movie
  • Marathi Bhasha Gaurav Din
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो
1

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो

‘छावा’ सिनेमादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचा खुलासा, ”माझ्या भावना चुकीच्या पद्धतीने…”
2

‘छावा’ सिनेमादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचा खुलासा, ”माझ्या भावना चुकीच्या पद्धतीने…”

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
3

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Love And War मध्ये आलिया- रणबीरसोबत विकी कौशलचा काम करण्याचा अनुभव कसा होता? एका वाक्यातच केलं कौतुक…
4

Love And War मध्ये आलिया- रणबीरसोबत विकी कौशलचा काम करण्याचा अनुभव कसा होता? एका वाक्यातच केलं कौतुक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.