आतापर्यंत जोडप्यांचा घटस्फोट झाला की पतीला पतीला पोटगी द्यावी लागत होती मात्र मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणात महत्तावाचा निर्णय घेत पतीलाही पत्नीप्रमाणे पोटगी मिळवण्याचा अधिकार असून, पत्नीनं पतीला पोटगी द्यावी, असं सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आजारपण किंवा अन्य कारणामुळं उत्पन्न कमावण्यास सक्षम नसलेल्या बेरोजगार पतीला, कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा कायदेशीर हक्कच आहे, असं स्पष्ट करत न्यायालयानं कल्याणमधील बेरोजगार पतीला दरमहा 10 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली आहे. त्यामुळे पतीला दिलासा मिळाला आहे.
बायकोकडून पोटगी मागण्याचा नवर्याला हक्क असून महिलांप्रमाणं पुरुषांनाही पोटगी मागण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय. आजारपण वा अन्य कारणामुळं उत्पन्न कमावण्यास सक्षम नसलेल्या बेरोजगार पतीला कमावत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा कायदेशीर हक्कच आहे, असं स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयानं कल्याणच्या बेरोजगार पतीला दरमहा 10 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली आहे.