ब्रेकींग! राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती; फोन टॅपिंगप्रकरणात ठरल्या वादग्रस्त; वाचा सविस्तर
Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांची आता थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या पोलीस अधिकारी यांची मोठ्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर चर्चांणा उधाण आले आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.
Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांची थेट राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी (Director General of Police) नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) रश्मी शुक्लांविरोधात (Rashmi Shukla) नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.
जाणून घ्या फोन टॅपिंग प्रकरण
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांचं नाव घेतलं जातं. रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागात आयुक्तपदावर असताना बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. फडणवीस सरकार सत्तेत असताना आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देखील बेकायदेशीर फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करण्यात आले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Web Title: Breaking appointment of rashmi shukla as director general of police of maharashtra state nryb