G+4 इमारतीचा वरचा भाग कोसळला
मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं होत. या पाण्यातूनन वाट काढताना नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवर देखील झाला. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात समस्येचा सामना करावा लागला. अशातच आता मुसळधार पावसामुळे मुंबईत एक दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या ग्रँट रोड रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या G+4 इमारतीचा वरचा भाग कोसळल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत चौघांना या ढिगाऱ्याखालून बाहेर काढल असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- मुंबईत जोरदार पावसाची हजेरी; अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरूवात; मुंबईकरांचे हाल
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बचाव कार्य सुरु केलं असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे ग्रँट रोड वेस्टर्न रेल्वे स्टेशनजवळील G+4 इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील काही भाग कोसळला. सकाळची वेळ असल्याने या रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु होती, अशातच ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आतापर्यंत चौघांना या ढिगाऱ्याखालून बाहेर काढल असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- दुर्दैवी! नंदुरबारमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचा नाल्याच्या पाण्यात पडून मृत्यू
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, मुंबईत कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे इमारतीचा जीर्ण झालेला भाग खाली कोसळला. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्य़ा मजल्यावरील बाल्कीना काही भाग कोसळल्याची माहिती आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून चौघांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य सुरु आहे. ही इमारत अतिशय जूनी असून जीर्ण झाली होती.