येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नय़े असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Pune Rain News : मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल (दि.14) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, मुंबई, रत्नागिरी, चिपळून या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये तर पावसामुळे रस्त्यांना नद्या नाल्यांचे स्वरुप आले आहे.
आजही मुंबईत पावसामुळे शहराची परिस्थिती वाईट आहे. अनेक भागात पाणी साचले आहे आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तसंच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यात कोकण विभाग तसंच मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान खात्याने आता ठाणे जिल्हाला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत शनिवारपासून पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आर्थिक राजधानीत आणखी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर शहरातील अनेक भागात पाणी साचले. वाहतूक कोंडीमुळे लोक अडचणीत सापडले आहेत
राज्यातील 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
CM Fadnavis on Mumbai Rain : मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तुफान पावसामुळे मुंबई अक्षरशः तुंबली आहे. याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरात काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यासोबतच मुंबई लोकल उशिराने सुरु आहे.
राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून मुंबईत दाखल झाला असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यातच आज म्हणजेच सोमवारी रात्री ११ वाजता मुंबईत समुद्रात ४.१ मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता आहे.
Mumbai Rain Update : मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले. याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे,
Maharashtra weather update : महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. मुंबई, पुणे आणि बारामतीमध्ये तुफान पाऊस झाला असून रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. आज पुन्हा एकदा मुंबईला अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.