फोटो सौजन्य -iStock
मुंबई उपनगरात कालपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबईतील अनेक सखल भागात देखील पाणी साचलं आहे. मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने आज राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेवर झाला आहे. रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत.
हेदेखील वाचा- दुर्दैवी! नंदुरबारमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचा नाल्याच्या पाण्यात पडून मृत्यू
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, विनाकारण घराबाहरे पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
हेदेखील वाचा- google tricks fun: ‘या’ अमेझिंग Google ट्रीक्स आत्ताच सर्च करा!
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. या जिल्ह्यातं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. रेल्वे वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशारीने सुरु आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील करूळ घाटात दरड कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. अशातच आता मध्य रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. मुसळधार पाऊस आणि रेल्वेत बिघाड झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या 10 ते 15 मिनिटांने उशीराने सुरु आहेत. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 5 ते 10 मिनिटांने उशीराने सुरु आहेत. हार्बर लाईनवरील लोकलही 10 ते 15 मिनिटांने उशीराने सुरु आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे भांडुप एल बी एस मार्ग पाण्याखाली गेला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं समोर येत आहे.