कल्याण : राज्यामध्ये सोन्याची चैन हिसकावून घेण्याचा प्रकार वाढला आहे. अनेक महिल्यांच्या चैन व मंगळसूत्र चोरट्यांकडून हिसकावून घेतली जातात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सोन्याचे अलंकार बाहेर घालावे की नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. 72 वर्षीय आजींच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावून चोरांनी पळ काढल्याची घटना घडली आहे. यामुळे कल्याण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
चहाच्या दुकानावर पाण्याची बॉटल खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन व्यक्ती दुकानात आल्या. त्यांनी 72 वर्षीय दुकानदार आजीच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावून चोरांनी पळ काढला. घटना पाहिल्यानंतर काही नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला आहे. नागरिक आपल्याला मारतील या भीतीने चोरट्याने नाल्यात उडी मारली आहे. पोलिसांनी देखील नाल्यामध्ये उडी मारली. पोलिसांनी एका चोरट्याला अटक असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
नेमकं घडलं काय?
डोंबिवली पूर्वेत कल्याण शीळ रस्त्यावर निश्मीता टी स्टॉल आहे. ७२ वर्षीय गुलाबी पुजारी या आजी हे दुकान चालवतात. मंगळवारी दुपारी आजी आपल्या दुकानात ग्राहकांसाठी चहा तयार करत असताना दोन जण त्यांच्या दुकानात आले. त्यापैकी एकाने सांगितलं मला पाण्याची बॉटल पाहिजे. आजी त्या ग्राहकाला बॉटल देण्यासाठी पाठीमागे फिरल्या असता याचा फायदा घेत ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने गुलाबी यांच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावली. या चोरट्याचा साथीदार दुकानाबाहेर स्कुटी घेऊन उभा होता. प्रकार घडल्यानंतर गुलाबी पुजारी यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. हे पाहून लोक दुकानाकडे धावले एवढेच नाही तर पोलीस देखील या रस्त्यावर उभे होते. ते देखील दुकानाकडे धावून आले. हे बघून चोरट्याचा साथीदाराने आपली स्कुटी चालू केली आणि तिथून पळ काढला. मात्र ज्यांने चैन हिसकावून घेतली होती तो चोरटा रस्त्यावर पळत होता. लोकांनी आपला पाठलाग सुरू केला. पकडले गेलो तर लोक मारतील या भीतीने या चोरट्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या नालात उडी मारली. त्यांनी उडी मारताच पोलिसांनी देखील नाल्यात उडी मारत चोरट्याला पकडले. चोरलेली चैन त्या नालात पडली. मानपाडा पोलिसांनी गणराज छपरवाल यांनी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या साथीदार भूषण जाधव याचा पुढील शोध घेत आहेत, अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.