
चाकण : राज्यातील नामांकित आणि अल्पावधीतच नावारूपाला आलेली औद्योगिक वसाहत म्हणजे चाकण नगरी,या औद्योगिक वसाहतीत आजमितीस ३ते ४हजार लहान, मोठे विविध कारखाने कार्यरत आहेत, या कारखान्यात काम करणारे असंख्य कामगार, परप्रांतीय, विदर्भ,मराठवाडा,खानदेश या भागातून चाकण परिसरात स्थाईक झालेले पहायला मिळत आहे, या सर्व कामगारांची दररोज कामावर जाण्या येण्याची लगबग, विविध वाहनांदवारे होत असते यात, खाजगी वाहने, प्रवासी रिक्षा,मोटर सायकल, चारचाकी वाहने ,शहर वाहतूक बसेस यामुळे तसेच कारखान्यांच्या चोवीस तासातील वेगवेगळ्या शिफ्टमुळे औद्योगिक वसाहतीत कायम दररोजची मोठी वर्दळ पहायला मिळते, तसेच यात भर म्हणून या ३तेचार हजार कंपन्यांचा कच्चा, पक्का माल वाहतूकीसाठी, छोट्या ऑटो रिक्षांपासून ते मोठ्या अवजड वाहनांमधून वाहतूक केली जाते.