आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरतो. हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे विशेषतः महत्वाचे आहे. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही बदल करावे लागतील. लाल फळे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया त्या 5 लाल फळांबद्दल.
हृदयाच्या आरोग्यासाठी बेस्ट आहेत ही लाल फळं (फोटो सौजन्य: iStock)

स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स मोठ्या प्रमाणावर असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये असलेले अँथोसायनिन्स रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात.

टॉमेटो: टॉमेटोमध्ये लाइकोपीन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो, जो हृदयाला मजबूत ठेवतो. याशिवाय, टॉमेटो रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवून कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो.

सफरचंद: सफरचंदमध्ये सोल्युबल फायबर (पेक्टिन) असते, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करते. तसेच, त्यातील पॉलिफेनॉल्स हृदयाच्या रक्ताभिसरणासाठी फायदेशीर आहेत.

चेरी: चेरीमध्ये पोटॅशियम आणि अँथोसायनिन्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरतात.

रास्पबेरी: रास्पबेरी अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे, जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यातील फायबर आणि व्हिटॅमिन सी हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.






