Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया

देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. अशातच सांगलीमधील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) गाडीला काही अज्ञात व्यक्तीकडून चप्पलांचा हार घालण्यात आला.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2024 | 02:07 PM
प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. अशातच सांगलीमधील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) गाडीला काही अज्ञात व्यक्तीकडून चप्पलांचा हार घालण्यात आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच त्यांच्या गाडीवर शाई फेक देखील करण्यात आली. मराठा समाजाच्या नादी लागू नका, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा आशयाचे पत्र देखील लिहून ठेवण्यात आले होते. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, प्रकाश शेडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला निंदनीय आहे. हल्ला करून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकवेळा माझ्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. घाबरून निवडणुकीतून माघार घेतली नाही. माझ्यामुळे जर महायुतीतील पक्षांना अडचण होत असेल तर मी बाजूला होतो. पण लवकरच एकत्रितपणे निर्णय घेऊन निवडणुकीच्या कमला लागलं पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.

प्रकाश शेंडगे असतील किंवा कुठल्याही पक्षाचा नेता असेल. कुठल्याही समाजाचा असेल, तर लोक ठरवतील त्याला किती मते द्यायची, त्याला किती विरोध करायचा. आपण लोकशाहीमध्ये दादागिरीकरून कोणालाही थांबवू शकत नाही. ,म्हणून प्रकाश शेंडगे यांचे संरक्षण करणे पोलिसांचे काम आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. प्रकाश शेंडगे यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

Web Title: Chhagan bhujbal reacts after the attack on prakash shendges car loksabha election obc nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2024 | 02:07 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • Election

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा
2

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.