आईसोबत शेतात गेले अन् अनर्थ घडला; दोन सख्ख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादाय घटना घडली आहे. आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्खा भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या रजापूर शिवारात ही घटना घडली. आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे फणसे कुटुंबावर शोककळा परसली आहे.
Pune: ५८ अंगणवाडीतील मुले अंधारात! धक्कादायक बाब उघड; वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित
प्रणव फणसे (वय ६) आणि जय फणसे (वय ९) अशी विहिरीत पडून मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील आडूळ बुद्रुक येथील कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापूर शिवारात शेती आहे. त्यांच्या स्वतःच्या शेतात आज मंगळवारी कृष्णा फणसे यांची पत्नी वर्षा फणसे आणि त्यांची दोन मुले प्रणव आणि जय असे तिघे जण सकाळी गेले होते. वर्षा फणसे ही शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे एकटी जमा करीत होती. तसेच त्यांची दोन्ही मुले बाजुला खेळत असताना वर्षा हिची नजर चुकवून दोघे कठडे नसलेल्या विहीरिकडे गेले. तेथे खेळत असताना त्यांचा तोल जाऊन ६ वर्षीय प्रणव आणि ९ वर्षीय जय या दोन्ही भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
विहिरित पडलेल्या आवाजामुळे वर्षा विहिरीकडे पळत सुटली. तिने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. यानंतर ताबडतोब सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, बीट जमादार अफसर बागवान आणि रणजीत दुल्हत यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने प्रणव याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तसेच मोठा मुलगा जय याचा मृतदेह लवकर सापडत नसल्याने शेवटी दुपारी ३ च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना पचारण करावं लागलं.
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकजवळ एका व्यक्तीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. सध्या पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रकार मानला जात आहे.नेमकी ही घटना काय आहे जाणून घेऊया…
प्राथमिक माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एन वॉर्ड विभागातील स्कायवॉकजवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे कर्मचारी या व्यक्तीचा मृतदेह खाली काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.