
यामुळे येथे हळूहळू अतिक्रमण वाढले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित सहायक आयुक्त कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानंतर महापालिकेने संबंधितांना अतिकरींना काढण्याबाबत नोटीसही दिली होती. मात्र त्यांनी या नोटिशीला न जुमानता अतिक्रमण कायम ठेवले होते.
सदरील अतिक्रमणामुळे सदरील रस्त्यावर वाहतुकीला मोठी अडचण होत होती. अखेरीस शनिवारी आयुक्तांकडे पुन्हा तक्रार आल्याने त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबीच्या सहाय्याने टिन शेड हटवले. या कारवाईत सहायक आयुक्त रमेश मोरे, इमारत निरीक्षक सैय्यद जमशीद आणि टीमने पार पाडली.
Ans: छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे जाफरगेट परिसरात दर रविवारी लागणाऱ्या आठवडी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली.
Ans: स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. विनापरवानगी टिन शेड आणि लोखंडी अँगलच्या साहाय्याने मोठा ढाचा उभारण्यात आल्यामुळे अतिक्रमण वाढले होते.
Ans: सदर ढाच्यासाठी महापालिकेकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती.