औरंगाबाद – एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रकार शहरातील मुकुंदवाडी परिसरात बुधवारी उघडकीस आला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून मुलीच्या पालकांनी तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात महिलेने पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक 112 वर फोन करून यासंदर्भात माहिती दिली. दामिनी पथकाने वेळीच येत लग्न थांबवले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरांमधून दामिनी पथकाला एक फोन आला होता. अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची एका महिलेने माहिती दिली. माहिती मिळताच त्या ठिकाणी दामिनी पथक पोहोचले. मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सगळी आपबिती सांगितली. सध्या ती दहावीचे शिक्षण घेत असून तिला एक लहान भाऊ आहे. तिचे वडील फर्निचरच्या दुकानात काम करतात तर आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाला हातभार लावते. मात्र, आर्थिक परिस्थितीही बेताची असल्यामुळे तसेच मुलीचे वय वाढल्यास पुढे स्थळ येणार नाही या भीतीने आईवडिलांनी नात्यातील मुलासोबत तिचे लग्न लावून देण्याचा घाट घातला. हि बाब पोलीसांनी दामिनी पथकाला कळविली असता उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, गिरिजा आंधळे यांनी धाव घेत लग्न थांबवले आणि पाहुणे मंडळी सर्वांना सांगून मुलीशी चर्चा करून विवाह थांबवला.
[read_also content=”महाराणा प्रताप पुतळ्यावर एक कोटी खर्च करण्याऐवजी राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करावी; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी https://www.navarashtra.com/chhatrapati-sambhajinagar/instead-of-spending-rs-one-crore-on-maharana-pratap-statue-sainik-school-should-be-started-for-national-service-demand-of-mp-imtiaz-jalil-nrdm-225878.html”]
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या, त्यातच घरातील आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अनेक मुलींची विविध प्रकारे कुचंबणा होत आहे. कोरोनामुळे पालकांचा मृत्यू, गरीबी, अशा अनेक कारणांमुळे कमी वयातच मुलींची लग्ने लावून कुटुंबावरील जबाबदारी कमी केली जात आहे हे वास्तव या घटनेने उघड झाले आहे.
[read_also content=”क्रूरतेचा कळस – एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करुन मारेकऱ्यांनी जाळले गुप्तांग, घटनेने उडाली खळबळ https://www.navarashtra.com/chhatrapati-sambhajinagar/marathwada/aurangabad/young-man-killed-by-crushing-with-stones-and-private-part-also-burnt-in-auranganbad-nrsr-225836.html”]