Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिकी एकादशीनिमित्त पैठणला भक्तांची मांदियाळी, गोदावरी तटावर हरिनामाचा गजर; नाथचरणी भक्त नतमस्तक

पहाटेपासूनच हजारो वारकरी, साधुसंत, महाराज मंडळी आणि भाविकांनी पवित्र गोदावरीत स्नान करून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 03, 2025 | 04:14 PM
कार्तिकी एकादशीनिमित्त पैठणला भक्तांची मांदियाळी (Photo Credit - X)

कार्तिकी एकादशीनिमित्त पैठणला भक्तांची मांदियाळी (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • कार्तिकी एकादशीनिमित्त पैठणला भक्तांची मांदियाळी
  • गोदावरी तटावर हरिनामाचा गजर
  • नाथचरणी भक्त नतमस्तक

पैठण (वा.) संतांचा प्रांत, भक्तीची भूमी आणि वारकरी परंपरेचा साक्षात उत्सव असलेल्या पैठणनगरीत कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने रविवार २ नोव्हेंबर रोजी भक्तीचा सागर उसळला होता. पहाटेपासूनच हजारो वारकरी, साधुसंत, महाराज मंडळी आणि भाविकांनी पवित्र गोदावरीत स्नान करून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.

आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला देखील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. या दिवशी संत नामदेव महाराजांची जयंतीही साजरी केली जाते. त्यामुळे पैठण नगरीत दिवसभर हरिनामाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले. सकाळी नाथ वंशजांनी विजयी पांडुरंगाचा महाअभिषेक करून धार्मिक विधींची सुरुवात केली. त्यानंतर नाथ मंदिराभोवती नगरप्रदक्षिणा काढत भाविकांनी टाळ-मृदुंगांच्या गजरात “राम कृष्ण हरी “च्या जयघोषात हरिनामाचा अखंड सोहळा रंगविला.

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा या गोष्टींचे दान, तुमच्या जीवनात येईल आनंद

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या कार्तिकी वारीत महाराष्ट्रभरातील वारकरी दिंड्या आणि फड आपापल्या परंपरेनुसार पायीवारी करत पैठण नगरीत दाखल झाले. दशमीपासूनच वाळवंट, गोदावरी तट, मठ-मंदिरे येथे भजन, कीर्तन आणि भारुडाचे कार्यक्रम सुरू झाले होते. भक्तिमय वातावरणात संत एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन भाविकांनी “देशात, जगात शांतता लाभो, सर्वांवर नाथकृपा राहो” अशी प्रार्थना केली.

टाळ-मृदुंगाच्या तालात खेळल्या फुगड्या

दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, महिला फौजदार जनाबाई सांगळे, उपनिरीक्षक वैभव सारंग, वाहतूक शाखेचे बाळू लोणे, जमादार राजेंद्र दाभाडे, चिडे व समादेशक राजू कोटलवार यांनी वाहतूक व सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. एसटी बस थाब्यावर बस न थांबवल्याने अनेक भाविकांना त्रास सहन करावा लागला. तरीही नाथांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये भक्तीचा महासागर उसळला होता. गोदावरी तटावर दिवसभर हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा ताल, फुगड्या, भजनी मंडळे आणि वारकरीच्या हळदी-कुंकवाच्या उत्साहात सत परंपरेचा तो अखंड वारसा पुन्हा एकदा जिवंत झाला.

Web Title: Devotees throng paithan on the occasion of kartiki ekadashi chanting of harinama on the banks of godavari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • Paithan

संबंधित बातम्या

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; 3 हजार पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त
1

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; 3 हजार पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.