पहाटेपासूनच हजारो वारकरी, साधुसंत, महाराज मंडळी आणि भाविकांनी पवित्र गोदावरीत स्नान करून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.
कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.