Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील महानगरपालिकेच्या संख्येत एकने वाढ होणार? ‘इथं’ स्वतंत्र महापालिका होण्याची शक्यता

मार्चनंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर लोकसंख्येच्या निकषानुसार नवीन नगरपरिषद किंवा 'क' वर्गाची महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2026 | 09:23 AM
वाळूज येथे स्वतंत्र महापालिका होण्याची शक्यता

वाळूज येथे स्वतंत्र महापालिका होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या संख्येत आणखी एका महापालिकेची भर पडण्याची शक्यता आहे.
  • छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसराला स्वतंत्र नागरी प्रशासन मिळण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
  • वाळूज महानगर, सिडको महानगर परिसरासह आसपासच्या गावांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात उपचारासाठी शहराच्या औद्योगिक पट्ट्यालगतच्या वाळूज परिसराला स्वतंत्र नागरी प्रशासनाचे कोंदण मिळण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. वाळूज महानगर, सिडको महानगर परिसरासह रांजणगाव, वडगाव कोल्हाटी आणि अन्य गावांतील १२ ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने माहिती संकलन सुरू केले आहे.

विविध विभागांकडून आवश्यक तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत असून, मार्चनंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर लोकसंख्येच्या निकषानुसार नवीन नगरपरिषद किंवा ‘क’ वर्गाची महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. मंगळवारी (दि.१७) प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी ही माहिती दिली. वाळूज परिसराच्या नागरीकरणाच्या दिशेने यापूर्वीच एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. वाळूज महानगरसाठी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे.

त्यापाठोपाठ आता स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याच्या हालचालींनाही प्रशासकीय पातळीवर गती मिळाली आहे. औद्योगिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरी सुविधांची गरज लक्षात घेता स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी महत्त्वाची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी ऑक्टोबरमध्ये वाळूज महानगरलगतच्या १२ ग्रामपंचायतींच्या हद्दी, लोकसंख्या आणि अन्य आवश्यक तपशील संकलित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयांकडून माहिती जमा करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदींनुसार नगरपरिषद स्थापनेसाठी आवश्यक निकषांची पूर्तता होते का, याची तपासणी केली जात आहे.

12 ग्रामपंचायतींचा समावेश

या कार्यवाहीत वडगाव कोल्हाटी, तिसगाव, शाहजापूर, पंढरपूर, करोडी, रांजणगाव शे.पू., वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपूर, आंबेलोहळ आणि तुर्काबाद खराडी या १२ ग्रामपंचायतींचा प्रस्तावित क्षेत्रात समावेश आहे. सध्या विविध विभागांकडून प्राप्त होणारी माहिती एकत्रित केली जात आहे. मार्चनंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर लोकसंख्येचा निकष विचारात घेऊन नगरपरिषद अथवा ‘क’ वर्ग महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वाळूज परिसराला नेमके कोणते नागरी प्रशासन मिळणार, याचे चित्र पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे.

FAQ

1. महाराष्ट्रात नवीन महानगरपालिका कुठे स्थापन होण्याची शक्यता आहे?

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात नवीन नागरी प्रशासन स्थापन होण्याची शक्यता आहे.

2. वाळूज परिसरात किती ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण प्रस्तावित आहे?

एकूण १२ ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करण्याचा विचार आहे.

3. कोणत्या भागांचा नवीन नागरी प्रशासनात समावेश होऊ शकतो?

वाळूज महानगर, सिडको महानगर, रांजणगाव, वडगाव कोल्हाटी आणि आसपासच्या गावांचा समावेश होऊ शकतो.

Web Title: Possibility of separate municipal corporation in waluj nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.