Sambhajinagar ZP News : संभाजीनगर जिल्हा परिषदेला २१५ कोटींचा निधी; डिसेंबरपासून विकासकामांना सुरुवात

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ या वर्षातील विकासकामांना डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या २१५ कोटी रुपयांच्या निधीचे विभागवार नियोजन पूर्ण झाले असून, सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुढील आठवड्यापासून निविदा प्रक्रिया सुरू होणार
Sambhajinagar ZP News  फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sambhajinagar ZP News फोटो सौजन्य सोशल मिडिया Sambhajinagar ZP News फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • डीपीसीच्या २१५ कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांचे नियोजन

  • सिमेंट रस्त्यांचे ५० ते ६० कोटी अन्य कामांसाठी

  • वित्त आयोग, सेस फंडातून या कामांना मिळणार प्राधान्य

Sambhajinagar ZP News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून मिळणाऱ्या २१५ कोटी रुपयांच्या निधीसह सेस फंडाचे विभागवार नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. डीपीसीच्या निधीत कोणतीही कपात झालेली नसून, सर्व विकासकामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुढील आठवड्यापासून निविदा प्रक्रिया सुरू होणार असून, डिसेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती झेडपी अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिली.

डीपीसीच्या २१५ कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांचे नियोजन

जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात अध्यक्ष गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली डीपीसी, उपकर (सेस) आणि वित्त आयोगाच्या निधीच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. यावेळी सीईओ मिन्नू पी. एम., अतिरिक्त सीईओ वासुदेव सोळंके, सर्व सभापती, विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष गलांडे यांनी डीपीसीच्या २१५ कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांचे नियोजन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती दिली होती. २०२६-२७ या वर्षांसाठी मंजूर झालेल्या या कामांना डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी डीपीसीची स्वतंत्र बैठक घेण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शासनाच्या सुधारित निर्देशांनुसार सिमेंट रस्त्यांची कामे नियोजनातून वगळण्यात आली आहेत. यापूर्वी या कामांसाठी प्रस्तावित असलेला २० टक्के निधी आता अन्य विकासकामांकडे वळविण्यात येणार आहे. लेखाशीर्ष ३०५४ आणि ५०५४ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी तसेच रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रामसचिवालय, यंदा 'जनसुविधा' या नव्या लेखाशीर्षांचाही समावेश करण्यात आला असून, त्याअंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे..

Sambhajinagar ZP News  फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sambhajinagar Bullion Market : सोनं-चांदी स्वस्त झालं, पण ग्राहकांची प्रतीक्षा कायम; सराफा बाजारात खरेदी मंदावली

सिमेंट रस्त्यांचे ५० ते ६० कोटी अन्य कामांसाठी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या डीपीसीच्या २१५ कोटी रुपयांच्या निधीत ३० टक्के कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शासनाच्या सुधारित निर्णयानुसार निधीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. केवळ सिमेंट रस्त्यांसाठी नियोजित केलेला सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचा निधी अन्य विकासकामांसाठी पुनर्नियोजित करावा लागणार आहे.

वित्त आयोग, सेस फंडातून या कामांना मिळणार प्राधान्य

१५व्या वित्त आयोगाकडून जिल्हा परिषदेला ६६ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधीतील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर सेस फंडातून वैयक्तिक लाभाच्या योजना, अंगणवाड्यांची दुरुस्ती, शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उभारणी, आवश्यक शैक्षणिक साहित्य, पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Sambhajinagar ZP News  फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sambhajinagar Schools Reopen : दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनाचे नियोजन