• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • The Reputation Of Stalwarts Is At Stake For The Post Of Mayor Political Competition Is At Its Peak In Sillod Paithan And Vaijapur

Chhatrapati Sambhajinagar: नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सिल्लोड, पैठण आणि वैजापूरमध्ये राजकीय चुरस शिगेला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस! सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचे २० वर्षांचे वर्चस्व पणाला, तर पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे यांना आव्हान.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 19, 2025 | 08:00 PM
नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला (Photo Credit - X)

नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीत मोठी रस्सीखेच
  • सत्तारांना २० वर्षांचे वर्चस्व टिकवण्याचे आव्हान
  • भुमरेंच्या गटाला स्वकियांनीच दिले आव्हान
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपालिका अन् एक नगर पंचायत निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे. अर्ज छाननीमध्ये मातब्बरांची अर्ज राहिले असून सर्वाधिक रस्सीखेच सिल्लोड, पैठण अन् वैजापूरमध्ये पहायला मिळणार असल्याचे चित्र आहे. शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना यंदा नगराध्यक्षपदाची खूर्ची ‘ताब्यात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. तर खासदार संदीपान भुमरे यांना स्वकियांनीच आव्हान दिल्याने नगराध्यक्षपदी त्यांच्या गटाचा उमेदवार आणण्यासाठी विरोधकांचे राजकीय ‘डाव’ उधळून लावण्यासाठी ‘खेळ’ करावा लागणार असल्याचे दिसते. तर दुसरीकडे उमेदवारी परत घेण्यासाठी त्या त्या तालुक्यात ‘घोडेबाजार’ रंगत असून ऐनवेळी ‘धोका’ नको म्हणून रिंगणात उतरलेल्या इच्छुकांचे मन वळवण्याचे काम सुरु झाले आहे. अशीच काही रंगत वैजापूरमध्ये पहायला मिळणार आहे. कारण आमदार विरुध्द नगराध्यक्ष असा रंगतदार सामना पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय ‘वजन’ दाखवण्याचे काम

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच आमदारांनी तालुक्यात वर्चस्व राहावे यासाठी ‘जुळवाजुळव’ सुरु केली होती. आधी महायुती, महाआघाडी म्हणून निवडणुकीत उतरण्याची भाषा करणाऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ऐनवेळी घुमजाव करीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेशित केले. शेवटच्या दिवशी अशी भूमिका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी दाखल करीत त्यांचे राजकीय ‘वजन’ दाखवण्याचे काम केले. मंगळवारी दाखल झालेल्या उमेदवारीच्या अर्जाची छाननी केली गेली.

भाजप नेतेही लागले कामाला

जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढवून एक नवरचा पक्ष म्हणून नावरुपाला आणण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने मंत्री अतुल सावे यांच्यासह सर्व नेते कामाला लागले आहेत, अशातच आमदार संजय केगेकर यांच्यासारखी मुलूख मैदानी तोफ म्हणून त्यांना पुढे केले जाणार आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्यारहठी देखील नगर परिषद निवडणूक पक्षासाठी महत्वाची ठरणार आहे. जिल्यात प्रशांत बंब आणि शहनात अतुल सावे हे दोघे आमदार होते, या दोन्ही नेत्यांवर जिल्ह्यात ‘वजन’ वापरून पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १३१२ उमेदवार मैदानात; घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण

आ. सत्तार यांच्यामुळे सिल्लोड केंद्रस्थानी..

सिल्लोड नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या १७अजपैिकी ५ अर्ज बाद होवून १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अजपिकी नगरसेवक पदासाठी ११८ उमेदवार पात्र ठरले आहेत. नगरसेवकांच्या २८ जागांसाठी २२९ अर्ज दाखल झाले होते. यापैकी १११ अर्ज बाद झाले असून २८ जागांसाठी ११८ उमेदवार रिंगणात आहेत. मागील वीस वर्षांपासून नगर परिषदेवर आमदार अब्दुल सतार गटाचा ताबा होता. राज्यासह जिल्ह्यातील सत्तेचे समीकरण बदल्यामुळे यंदा नगराध्यक्षपदाची खूचीं ताब्यात ठेवणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उबाठा सेना गटात प्रवेश करणारे सुरेश बनकर यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करुन सतार याच्यासमोर पंच उभा केला आहे. तर दुसरीकडे खा. डॉ. कल्याण काळे यांनी देखील सिल्लोड ताब्यात मिळवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लावले आहेत. अशातच सिल्लोड निवडणूक जिल्ह्यात केंद्रस्थानी आली आहे.

वैजापूरसाठी प्रतिष्ठा पणाला…

वैजापूर नगर परिषदेवर निविर्वाद वर्चस्व गाजवणाऱ्या दिनेश परदेशी दाम्पत्याने विधानसभा निवडणुकीच्या तोडावर उबाठा सेनेत प्रवेश करुन शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांच्या विरोधात निवडणूक लढवून अडवणी उभ्या केल्या होत्या. तेच परदेशी पुन्हा भाजपमध्ये परतले असून आता त्यांनी नगराध्यक्षपदी आपलाच दावा करुन उमदेवारी दाखल केली आहे. असे असले तरी तालुक्यात ‘मैत्रीपूर्ण’ लढत होण्याचे बोलले जात असले तरी या निवडणुकीत वचपा काढण्यासाठी रणनिती आखली जात आहे. या खेळात आमदार की नगराध्यक्ष बाजी मारतात हे पाहावे लागणार आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Weather: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

पुन्हा एकदा भुमरेशाही

शिवसेनेत ‘खिंडार’ पहल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली होती, त्यावेळी युती असल्याने एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या ताब्यातील खासदारकी संदीपान भुमरे यांनी हिसकावून घेत पुन्हा एकदा भगवा फडकावला होता.

यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र विलास भुमरे याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. खासदारांनी सर्वच विधानसभेच्या जागा प्रतिष्ठेच्या करुन पूर्वीपेक्षा एक अधिक जागा शिंदे गटाकडे खेचून आगली. यात कन्नड विधानसभेची जागा ही उबाठा गटाकडे होती,

त्या जागेवर रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना निवडून आणत पक्षाची ताकद दाखवून दिली. जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या खा. भुमरे यांना पुन्हा एकदा नगर परिषेदेवर ‘भुमरेशाही’ असल्याचे दाखवून देण्यासाठी राजकीय खेळी खेळावी लागणार आहे.

Web Title: The reputation of stalwarts is at stake for the post of mayor political competition is at its peak in sillod paithan and vaijapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन
1

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू
2

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ
3

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक
4

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM
IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

Feb 27, 2026 | 09:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.