सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १३१२ उमेदवार मैदानात; घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण
२१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी परत घेण्याच्या दिवसापर्यंत राजकीय ‘घोडेबाजार’ चर्चेत येणार आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिका अन् एक नगरपंचायत वर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आदेश युतीच्या नेत्यांनी दिले आहे तर दुसरीकडे राज्यात बदलेल्या सत्तासमीकरणात आमदारांना स्वतःचे अस्तित्व अजूनही जिवंत असल्याचे दाखवणारी ‘परीक्षा’ असल्याची चचर्चा रंगली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी सर्वात जास्त उमेदवार सिल्लोडमध्ये असल्याने आमदार अब्दूल सत्तार यांना विरोधकांचे राजकीय ‘डाव’ उधळून लावण्याची रणनिती आखावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण १३१२ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. निवडणुका विविध कारणांनी अनेक वर्ष लांबल्या होत्या.
न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजताच तालुक्यातील वॉर्डस्तरीय नेते सक्रिय झाले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी लोकल पातळीवरील नेत्यांवर उमेदवार निवडीची जबाबदारी सोपवल्याने ‘जागा एक आणि उमेदवार अधिक’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी हे महायुतीत एकत्र असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तोच फॉर्म्युला लागू होईल, असे मानून अनेक इच्छुकांनी थोडे मागे घेतले होते. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही महायुतीकडून स्पष्ट संकेत न मिळाल्याने स्थानिक आमदारांनी ‘मैत्रीपूर्ण निवडणूक’ लढवण्याचे जाहीर करत इच्छुकांना थेट अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले.
यामुळे जिल्ह्यातील सहा इच्छुक नगराध्यक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. परिणामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि पैठण नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिल्लोड नगरपालिकेत आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र आहे. तर पैठणची नगरपालिका परंपरेनेच राजकीय रणनीती आणि अंतर्गत खेळींसाठी चर्चेत राहणारी असल्याने या वेळीही स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण १३१२ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यात नगराध्यक्षपदासाठी ८८ तर सदस्यपदासाठी १३१२ अर्जाचा समावेश आहे. यात पैठणमध्ये सर्वाधिक ३०४ अर्ज आले आहेत. अध्यक्षपदासाठी सर्वाधिक १० अर्ज सिल्लोडमधून तर सदस्यपदासाठी सर्वाधिक २९० अर्ज पैठणमधून दाखल झाले आहेत. आता २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, २१ रोजी लढत्तीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
१७ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
१८ नोव्हेंबर अजांची छाननी
२१ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत
२६ नोव्हेंबर चिन्ह वाटप
२ डिसेंबर मतदान
३ डिसेबर मतमोजणी






