फोटो सौजन्य सोशल मिडिया
Chief Minister’s Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ पुरस्कार वितरण आणि २०२६-२७ या वर्षासाठी अभियानाचा शुभारंभ पार पडला हा कार्यक्रम नाशिक येथे पार पडला, ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्ध पंचायतराज अभियान 2025-2026 अंतर्गत विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’ आणि ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, तसेच पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा देण्यात आला. त्याच बरोबर गुणानुक्रमे जिल्हा परिषद गटात नाशिक, पुणे आणि सांगली तर पंचायत समिती गटात नाशिक,खालापूर (जि. रायगड) आणि राहाता (जि. अहिल्यानगर) या समित्यांचा प्रथम,द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अडाचीवाडी ता.पुरंदर प्रथम, खामशेत, ता. गुहागर, जि . रत्नागिरी आणि लाडूद, ता. बागलाण, जि. नाशिक (द्वितीय विभागून), उटी बु.ता.औसा,जिल्हा लातूर, कोतवालबर्डी, जिल्हा नागपूर (तृतीय विभागून) या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन यूथ फेस्टिव्हल मैदानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,पालकमंत्री गिरीश महाजन,शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार गोकुळ गीते यांची उपस्थिती होती.
तसेच प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, डाॅ राहूल आहेर, ॲड. राहूल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, सरोज अहिरे, नितीन पवार, विवेक कोल्हे, उपमहापौर विलास शिंदे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रतिभा संगमनेरे यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले सरपंच, लोकप्रतिनिधी ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येत या कार्यक्रमात सहभागी झाले.






