मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा आजपासून औरंगाबाद दौरा (Aurangabad Tour) सुरू होत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांची पेढेतुला होणार असून संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांचीही लाडूतुला (Ladoo Weight) होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा चर्चेत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज दुपारी दोन वाजता सभा पैठणमध्ये (Paithan) होणार आहे. त्यापूर्वी त्यांची पेढ्यांनी तुला केली जाणार आहे. तर, संदिपान भुमरे यांची लाडूतुला होणार आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात गेलेले संदिपान भुमरे पैठणमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या सभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
तुला करण्यासाठी १०० किलो पेढे तयार करण्यात आले आहेत. तर, संदिपान भुमरे यांच्या तुलेसाठी १०० किलो लाडूही तयार ठेवण्यात आले आहेत. हे लाडू आणि पेढे तयार करण्यासाठी सहा तास लागले. लाडू आणि पेढ्यांसाठी दोन्हीसाठी प्रत्येकी १७ हजार रुपये खर्च आला आहे. या पेढ्यांसाठी ७० किलो खवा वापरण्यात आला आहे.