Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray
मुंबई : राज्यात असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन ऑनलाईन स्वरूपात साजरा केला होता. यंदा कोरोनाचे सावट दूर होऊन निर्बध शिथिल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईबाहेर औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. त्यामुळे यावर्षी शिवसेनेचा वर्धापनदिन जंगी स्वरूपात साजरा करण्याची चिन्हे असताना यंदाचाही वर्धापनदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे(Chief Minister Uddhav Thackeray decided to celebrate Shiv Sena’s anniversary online).
१९ जून रोजी शिवसेनेचा ५५ व वर्धापन दिन आहे. यादिवशी शिवसेनेच्यावतीने राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वर्धानपन दिनानिमित्त शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असतात. परंतु, यंदाच्या वर्धापनदिनावर कोरोनाचे वाढते रूग्ण आणि विधानपरिषद निवडणुकीचे सावट पडले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना उद्या सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत माहिती देताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, सध्या मुंबईमध्ये तीन साडेतीन हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. वर्धापन दिनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला तर गर्दी वाढेल. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]