Chief Minister Uddhav Thackeray is easily upset; Water Resources Minister Jayant Patil's reaction on Rajya Sabha election results
सातारा : राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाराजी होणे सहाजिक आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडुन येणे गरजेचे होते मात्र तो आला नाही. झालेल्या मतदानाबाबत त्यांना खुलासा झाला असेल मात्र या बाबत त्यांचे आणि माझे बोलणे झाले नाही असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले(Chief Minister Uddhav Thackeray is easily upset; Water Resources Minister Jayant Patil’s reaction on Rajya Sabha election results).
राष्ट्रवादी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील रविवारी सातारा जिल्ह्यातील माण तालुका दाैऱ्यावर आले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बाेलताना मंत्री पाटील यांनी आमच्यात कोणताच अंतर्गत वाद नाही असे स्पष्ट केले. पाटील म्हणाले उलट आम्हाला अपक्षांचा पाठींबा मिळाला. त्यातल्या चार ते पाच लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही असे दिसत आहे.
विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे मिळुन १५३ एवढी मते आहेत. मात्र आम्हांला मिळालेल्या पाठींब्यावर आम्ही १६३ पर्यंत आहोत. आम्हाला यापुर्वी सुद्धा मदत केलेल्या अपक्षांमधील ४ ते ५ लोकांच मत राज्यसभा निवडणुकीत दुसऱ्या बाजुला गेल्याचे दिसत आहे. परंतु यात जास्त काळजीचा विषय आहे असे वाटत नसल्याचे मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]